तांबडा गुलमोहर झाडावरील गुलमोहर फुलांचा पडलेला सडामोहक असे प्राजक्त फुले पांढऱ्या रंगाचे असून पाकळ्यांचा रंग तर फुलाची दांडी ही नारंगी असते. बकुळा फुल हे लहान पण अतिशय सुंदर दिसणारे फुल आहे. पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या तर मध्यभागी पिवळा भाग असल्याने अशा सौंदर्यामुळे हे फुल भुरळ पाडते. विविध प्रकराचे झेंडुचे फुले असून त्यात पिवळे, नारंगी तसेच दोन्ही रंगाचे एकत्र असे असे देखील झेंडूचे फुल असते.पळसाचे झाड साधारण जंगलात असतात. कुठे फिरायला जात असतांना रस्त्याच्या कडेला पळसा्च्या झाडाखाली या लाल फुलांचा सडा नक्कीच सर्वांना प्रफुल्लीत करतो. भारताचे राष्ट्रीय फुल हे कमळ असून विविध प्रकाराचे कमळ फुलाचे प्रजाती आढळतात. तलावात कमळाचे फुलाचे सौंदर्य सर्वांना मोहीत करून टाकते.मोगरा फुल जेवढे झाडावर सुंदर दिसते तेवढाच तिचा सुंगध देखील मंत्रमुग्ध करतो. पांढऱ्या रंगाच्या या फुल मन प्रसन्न करते. रातराणीच्या फुलांच्या गंध करतो बेधुंद. फुल सौंदर्य व गंध मोठा मात्र आकार लहान पण सर्वांना मोहीत करणारा.लालबुंद जास्वंदाचे फुल पाहिले की मन प्रसन्न होते. या फुलाचा वापर केवळ देवाला वाहन्यापूर्ता नसून हे फुल व झाड आर्युर्वेदीक वनस्पती देखील असून विविध आजार तसेच केस गळतीवर या फुल गुणकारी आहे.