तृणमुल कॉग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री म्हणून प्रसिध्द असणारी अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होताना दिसत आहे. तिच्या लग्नावरुन ती ट्रोल झाली होती. त्यानंतर विविध मुद्द्यावरून चर्चेत आलेली नुसरत जहांचा चाहता वर्गही तितकाच आहे. नुसरतच्या इन्स्टाग्रामवर तिचे 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. पाहा फोटोज..

तृणमूल काँग्रसेची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहांने बोल्ड फोटोशूट केले असून ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
काही तासांतच लाखांच्या घरात लाइक, कमेन्ट आल्या होत्या
फिल्मी दुनियेत छाप पाडल्यानंतर नुसरत जहां लोकसभेवर निवडून आली. तृणमूल काँग्रेसने नुसरतला बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. तिने भाजप उमेदवार शांतनू बासू यांचा तब्बल साडेतीन लाखांच्या मताधिक्यासह पराभव केला होता.
अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्तीही नुसरत जहांच्या जोडीने खासदारपदी निवडून आली आहे. दोघींनी संसदेबाहेर केलेलं फोटोशूट चांगलंच गाजलं होतं. या दोघीही बंगाली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.
नुसरत जहांने 19 जून 2019 रोजी तुर्कीतील बोडरम शहरात निखिल जैन या व्यावसायिकाशी हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर नवरात्रीतही तिने पारंपरिक हिंदू पोशाखात पूजा केल्यामुळे तिच्यावर टीका झाली होती. परंतु तिने विरोधकांची तोंडं गप्प केली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here