तुम्हाला माहिती आहे का नक्की काय घडलं??

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज वांद्रे सी लिंक (Bandra-Worli Sea link) ते बीकेसी (BKC कलानगर) ला जोडणाऱ्या पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण केले. वांद्रे पूर्व येथील वाहतूक जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून एमएमआरडीएने (MMRDA) ही मार्गिका दोन्ही बाजूने जाण्या-येण्यासाठी सुरू केली. यातील एका बाजूच्या मार्गाचे लोकार्पण आधीच करण्यात आलं होतं. पण दुसऱ्या मार्गाचं लोकार्पण आज झालं. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. पण एका प्रश्नाचं उत्तर न देताच ते तेथून निघून गेल्याचं दिसलं. (CM Uddhav Thackeray Walked away without giving any answer on such issue)

Also Read: लसीच्या दोन डोसनंतर मुंबईत इतक्या लोकांना झाली कोरोनाची बाधा

हा मार्ग वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याने या लोकार्पण सोहळ्यासाठी भाजपचे नेतेमंडळीदेखील उपस्थित राहतील अशी माहिती आधी मिळाली होती. पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे भाजपमधील नेत्यांनी या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. इतकेच नव्हे तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे नाव असूनही मुंबई कलानगर जंक्शन उड्डाणपूलाच्या लोकार्पण सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. प्रत्येक वेळेस ठाकरे सरकार विरोधकांचा अपमान का करतं आहे? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईच्या विकास कामांच्या कार्यक्रमांतून का डावललं जातं आहे? असा प्रश्न प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी उपस्थित केल्याचीही माहिती आहे. याबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर देणं टाळलं आणि ते निघून गेले.

Also Read: “सामना म्हणजे क्षणभराचं साहित्य अन् अनंतकाळची रद्दी”

उद्धव-ठाकरे

लोकार्पण सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्री ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ”माझं बालपण या परिसरात गेलेलं आहे. मी 66 वर्षांपासून येथेच राहतोय. कलानगरपासून वांद्रेच्या स्टेशनपर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता, तेव्हा मी रेल्वे रुळावरुन प्लॅटफॉर्मवर जायचो. धारावी वाढली, बीकेसीची वाहतूकदेखील वाढली. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी अनेक प्रकल्पांचे लोकार्पण सध्या सुरू आहे”. याच वेळी पत्रकारांनी त्यांनी, लोकार्पण कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार का टाकला?, असा प्रश्न विचारला. पण त्यावर काहीच उत्तर न देता ते निघून गेले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here