हिंदीमधील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला कलाकार म्हणजे सीझान खान(cezanne khan). सीझानने त्याच्या अभिनयामुळे छोट्या पडद्यावर विशेष स्थान निर्माण केले होते. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख होती. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील सीझानच्या अनुराग बासू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. नुकतेच त्याने अभिनेत्री श्वेता तिवारीबद्दल (shweta tiwari) वक्तव्य केले आहे. श्वेतामुळे त्याचं स्टारडम संपले व श्वेता ही त्याच्या करिअरमधील सर्वात मोठी चूक आहे, असे सीझान म्हणाला. (kasautii zindagii kay actor cezanne khan talk about shweta tiwari that she was my mistake)

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सीझान म्हणाला, ‘श्वेता ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. अशी चूक मी पुन्हा करणार नाही. मला तिच्याशी आता काही घेणंदेणं नाही. ती काय करतेय मला माहित नाही. मालिकेच्या निमित्तानं आमच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. आम्ही खूप खासगी गोष्टी देखील शेअर केल्या होत्या. पण त्या गोष्टी आता व्यर्थ आहेत.’ ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये श्वेताने सीझानची प्रेयसी म्हणजेच प्रेरणाची भूमिका साकारली होती. त्यावेळी या मालिकेतील प्रेरणा आणि अनुरागच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होता. या मालिकेमुळे सीझान आणि श्वेताच्या अफेअरच्या चर्चा होत्या. त्यामुळे श्वेता आणि राजा चौधरीचा घटस्फोट झाला असंही म्हटलं जातं.

cezanne khan and shweta tiwari

Also Read: ‘सत्यमेव जयते!’ जामिनावर सुटल्यानंतर पर्ल पुरीची पहिली पोस्ट

1998 साली श्वेताने राजा चौधरीसोबत लग्न केले. त्यानंतर 2007 साली त्यांचा घटस्फोट झाला. 2010 पासून श्वेता अभिनवला डेट करत होती. 2013 मध्ये श्वेता आणि अभिनव विवाहबंधनात अडकले. नोव्हेंबर 2016 मध्ये श्वेता आणि अभिनव यांना मुलगा झाला. मात्र दोघांमधील मतभेदांमुळे ते वेगळे झाले.

Also Read: आठवड्यातील प्रत्येक रविवार आता गुन्हेगारांच्या नाकीनऊ आणणार!

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here