पनीर चे वैशिष्ट असे आहे की, पनीर कोणत्याही भाजीसोबत मिक्स करून खाल्ल्याने भाजी टेस्टी होतेच. शिवाय आरोग्याला देखील खूप फायदेशीर ठरते.
पालक पनीर:
पालक सारख्या हिरव्या भाजीला पनीर सोबत मिक्स करून एक टेस्टी भाजी कशी बनवायची हे उत्तर भारतीयांकडून शिकले पाहिजे.

शाही पनीर:
उत्तर भारतातल्या लोकप्रिय भाजीमध्ये शाही पनीर चा देखील समावेश आहे. याला बनवण्यासाठी मसालेदार टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये शिजवले जाते.
पनीर आणि कॉर्न क्रॉकेज: पनीर पासून तयार झालेल्या रेसिपीमध्ये कमीत कमी तिखट असते. ही डिश तुम्हाला युरोपीय खाद्यसंस्कृतीची आठवण करून देईल.

चिली पनीर:
पनीर एक स्वादिष्ट इंडियन चायनीज रेसिपी आहे. जी नाश्ता मध्ये आपल्या खायला दिली जाते.

पनीर टिक्का:पनीर टिक्का एक पंजाबी शाकाहारी डिश आहे. ज्यामध्ये पनीरचे तुकडे मसाल्यामध्ये मिक्स करून तंदूर सारखे बनवले जाते
कच्चे पनीर: जर तुम्हाला कच्चे पनीर खायचे असेल. किंवा खायला आवडत असेल, तर यामध्ये सोयासॉस आणि तीळ मिक्स कॉम्बिनेशन करून तुम्ही ट्राय करू शकता.

मटर पनीर: मटर पनीर मसाले दार अशी पंजाबी डिश आहे. त्यामध्ये टोमॅटो, मटर आणि पनीर चा वापर केला जातो. ज्याला खासकरून भात आणि नान सोबत खायला दिले जाते.

पनीर भुर्जी:
पनीर भुर्जी बनवण्यामध्ये खूप सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपि आहे. याची टेस्ट खूप छान असते.

पनीर काठी रोल्स:
पनीर काठी रोल खासकरून भारतीय लहान मुलांचा एक लोकप्रिय नाश्ता आहे. जो बनण्यासाठी खूप सोपा आहे. शिवाय पौष्टिकही आहे.

मशरूम:
मशरूम सारख्या हेल्दी डिश सोबत पनीर उकडून घेऊन ते खूप चांगले स्वादिष्ट डिश बनवता येते.

पनीर फ्राईड राईस:
पनीर फ्राईड राईस स्वादिष्ट चायनीज रेसिपी आहे. जी घरच्या घरी बनवणे खूप सोपी आहे.
पनीर दो प्याज:
पनीर दो प्याजा एक पंजाबी भाजी आहे. ज्यामध्ये पनीर सोबत कांद्याचा वापर जास्त केला जातो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here