नागपूर : हिमालय म्हणजे (Himalaya) पृथ्वीवरील स्वर्ग. बर्फाच्छादित पर्वत, नद्या, सूचीपर्णी वृक्षांचं जंगल, दऱ्याखोऱ्यांतील गावं आणि विविध रंगांत न्हाऊन निघणारे आकाश या साऱ्यांमुळे इथला निसर्ग प्रत्येक क्षणी आपल्याला वेड लावत असतो. हिमालयात फुलणारी फुलांची खोरी हाही एक आकर्षणाचा विषय आहे. या फुलांच्या बहरासाठी हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ (Valley of Flowers National Park) हे उत्तराखंडमधील ठिकाण जगप्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५० मीटर उंचीवर असणाऱ्या या नॅशनल पार्कमध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हजारो प्रकारची फुले बहरतात. फुलांचा हा बहर पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो पर्यटक या खोऱ्याची वाट तुडवत इथे येतात. (A-valley-of-flowers-blooming-in-the-Himalayas)








Esakal