गरम गरमा कॉफीचा कप हातात घेऊन निवांतपणे घराच्या खिडकीत बसून, बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेताना मॉन्सून अगदी उबदार असल्याचे जाणवते. पण जेव्हा तूम्ही घराबाहेर जाऊन पावसामध्ये भिजता तेव्हा तुम्हाला हाच मॉन्सून खूप त्रासदायक आहे असेही वाटेल. त्यामुळे तुमची दैनदिन आयूष्य आणखी सोपे बनिवण्यासाठी आणि मॉन्सूनचा पुरेपर आनंद घेण्यासाठी तुम्हाला काही हॅक्स सांगणार आहोत. (Monsoon Hacks That will Help You Enjoy Your Favorite Season To The Fullest)
1. तुमचा फोन पावसात भिजला तर…..

तुम्ही तुमच्या फोनला कितीही जीवापेक्षा जास्त जपले तरीही तो पावासामध्ये भिजतोच. पावासाच्या पाणी फोनच्या आतमध्ये शिरल्यास त्रासदायक ठरु शकते आणि तुमचा फोन चालणे आणि फोन बंदही पडू शकतो. तुमचा फोन पुन्हा व्यवस्थित सुरु करण्यासाठी तुमचा फोन कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या आणि तांदळामध्ये ठेवा. फोनमध्ये शिरलेले पाणी शोषून घेण्याचे काम तांदूळ करते आणि तुमचा फोन व्यवस्थित पुर्वीसारखा काम करु लागतो.
2. आजारी पडणे टाळण्यासाठी

पावसाळ्यातील वातवरणामध्ये तुम्ही सहज आजारी पडू शकता. त्यामुळे या वातावरणामध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कपभर लिंबू पाण्यामध्ये मध आणि आले टाकून थोडे थोडे प्या.
3. माश्यांपासून दूर राहण्यासाठी

पावसाळ्यात सर्वात माश्या खूप त्रास देतात. त्यांच्यापासून सुटका हवी असेल तर लिंबाचे दोन तुकडे करून खिडकी आणि दरवाज्यावर ठेवा. लंवग ठेवले तरी चालेत कारण माश्या त्यापासूनही दूर पळतात.
4. तुमचे कपटापासून मच्छरांना लांब ठेवण्यासाठी

पावसाळ्यात लाकडाला सहज वाळवी लागू शकते. वाळवीपासून सूटका हवी असल्यास फर्निचरला अ-सुगंधीत केसांना लावण्याचे तेलाने पॉलिश करा. त्यामुळे लाकडाला ओल लागत नाही आणि वाळवीदेखील होत नाही
5. भिजलेले शूज सुकविण्यासाठी

तुम्हाला पावसाळ्यात तुमचे शूज भिजतील आणि खराब होतील याची काळजी वाटतेय का? मग मेनाची मेनबत्ती तुमच्या शुजवर घासा त्यांनतर पावासात घराबाहेर पडा. शुजवर जमा झालेले पावासाचे पाणी पुसण्यासाठी तुम्हाला पेपर टॉवले सोबत बाळगू शकता.
6. ओले कपडे सुकविण्यासाठी

ओले कपडे सुकविणे ही पावसाळ्यात खूप मोठी समस्या आहे कारण हवेतील ओलसरपणामुळे कपडे कोरडे होत नाहीत. तुम्हाला तुमचे कपडे घराच्या आतच जिथे फॅन असेल तिथेच सुकवावे लागतील.
7. आपण पोर्टेबल सॉक्स ड्रायर ऐकले आहे?

पावसाळ्यात जसे भिजलेले शूज आणि ओले कपडे सुकवणे ही मोठी समस्या आहे तसेच ओले सॉक्स सुकवणे हीही तितकेच अवघड काम आहे. पावसाळ्यात ओले सॉक्स सहज सुकविण्यासाठी पोर्टेबल सॉक्स ड्रायर वापरु शकता. तुम्हाला त्याची नक्कीच गरज असेल.
8. आपले केस डी-फ्रिझ करण्यासाठी

पावसाळ्यात तुमचे केस खूप फ्रिझी होऊ शकतात. तुमचे केस डि- फ्रिझ करण्यासाठी केसांना हॅन्ड क्रिम वापरा. हातावर थोडीशी किम घेऊन फक्त केसांना लावा.
9. पावसात मेकअपची अशी घ्या काळजी..

पावसाळ्यात मेकअप धूऊन गेल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील खूप डाग दिसतात. चेहऱ्यावरील ओलावा कमी करण्यासाठी तुम्ही ब्लॉटिंग पेपरचा वापर करा.
10. ओले झाल्यावर येणाऱ्या दुर्गंधापासून राहा दूर

तुम्ही पावसात भिजलेले असताना आणि त्यानंतर येणाऱ्या दुर्गंधीसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. दुर्गंधी पासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही कपड्यावर परफ्युम मारू शकता.
Esakal