जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या (corona) ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे (Delta Plus’ variant) रुग्ण (Patient) आढळून आल्याने जिल्ह्यात आजपासून मिनी लॉकडाउन (Mini lockdown) सुरू झाला आहे. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी (Curfew)असल्याने आज सकाळपासूनच बाजारपेठामध्ये (Market) नागरिकांची गर्दी दिसून आली. सायंकाळी पाचनंतर मात्र सर्वत्र संचारबदी होती. पोलिस (Jalgaon Police) रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवित होते. सर्व बाजारपेठांमध्ये चारनंतर शुकशुकाट होता.
(jalgaon mini lockdown rules police strict enforcement)
Also Read: ५४१ ग्रामपंचायतींचा ‘डीएससी’कडे नोंदणीस नकार
जिल्ह्यात कोरोना ॲक्टीव रुग्णांची संख्या ७०० आहे. काल कोरेाना चाचण्यामध्ये केवळ २५ पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले होते. असे असले तरी राज्य शासनाने ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे राज्यात दूपारी चार पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर सायंकाळी पाच ते सकाळी पाच पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आज सुरु झाली. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने दूपारी चारपर्यंत बाजारपेठा, व्यापारी संकुले गर्दीने गजबजली होती. चारनंतर मात्र सर्व बंद झाले. पोलिसांनी साडेतिनलाच दुकाने बंद करण्याची तंबी दिली होती.

विनाकारण फिरता येणार नाही
या मिनी लॉकडाऊनमध्ये सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने, हॉटेल सकाळी सात ते दुपारी चारपर्यंतच सुरू राहू शकतील. शनिवार व रविवारी सप्ताहअखेरला अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ पूर्णतः बंद राहील. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आज सायंकाळी पाच पासून पुन्हा लागू करण्यात आली आहे. पहाटे पाचपर्यंत ती लागू राहील. मेडिकल इमर्जन्सी वगळता कुणालाही विनाकारण फिरता येणार नाही.
Also Read: या फुलांचे हे सौंदर्य बघीतले तर..तुमचे मन होणार प्रसन्न!

विनामास्कचे प्रमाण वाढले
बाजारपेठात गर्दीमध्ये विना मास्क असलेले अनेक नागरिक आढळून आले आहे. ते कोरेाना वाढीस कारणीभूत ठरू शकतात. महापालिकेने विशेष पथके स्थापून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली तर नागरिक किमान मास्क वापरतील, कोरोना मोठ्या संख्येने स्प्रेड होणार नाही.
Esakal