पुणे – कोरोनाचे लसीकरण (Corona Vaccination) आणि नव्याने येणाऱ्या स्ट्रेनवर (Strain) तिसऱ्या लाटेचे (Third Wave) भविष्य अवलंबून असून, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्य (Milder) असेल. अशी स्पष्टता इंडियन जर्नल ऑफ मेडीकल रिसर्चच्या शोधनिबंधातून येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींमधील रोगप्रतिकारशक्ती, लसीकरणाचा वेग, नवे स्ट्रेन आणि निर्बंधांच्या एकत्रित अभ्यासातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. (The Third Wave is Milder than the Second Wave)
भारतीय वैद्यक संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) डॉ. बलराम भार्गव, डॉ. संदीप मंडल, तसेच पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे(नारी) डॉ. समिरण पांडा आणि इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनचे डॉ. निर्मलान अॅरिनामीपॅथी यांनी हे संशोधन केले आहे. देशात पुढील तीन महिन्यात ६० टक्के लसीकरण झाले तर तिसऱ्या लाटेपासून मोठा दिलासा मिळेल असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

तिसऱ्या लाटेचे चार वाहक
-
कोरोना होऊन गेलेल्यांची कमी होणारी रोगप्रतिकारशक्ती
-
नव्या तयार होणारे कोरोना विषाणूचे प्रकार (व्हेरियंट)
-
अति प्रसारक नवे स्ट्रेन
-
नागरिकांनी नियमांचे पालन न करणे
थोपवणारे चार घटक
-
६० टक्क्यांपर्यंत लसीकरण
-
शारिरिक अंतर, मास्क आणि हात स्वच्छ धुणे
-
आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे
-
अनुशासनाचे पालन
महत्त्वपूर्ण निष्कर्ष
-
कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरली नाही
-
वाढते लसीकरण, कोरोना होऊन गेलेल्यांची मोठी संख्या, संचार निर्बंधामुळे तिसरी लाट उशिराने आणि सौम्य
-
सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तिसरीच लाट सुरू होण्याची शक्यता
-
मात्र तीला अतिउच्च पातळी गाठण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल
-
अत्यवस्थ किंवा मृत्यूचे प्रमाण दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल
शास्त्रज्ञांच्या सूचना
-
वैयक्तीक पातळीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी
-
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि संपूर्ण यंत्रणेत सरकारी पातळीवर समन्वय कायम ठेवावा
-
शक्य होईल तसे लसीचे दोन डोस पूर्ण करावे
-
लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करावे
संशोधनाच्या मर्यादा
-
हा माहितीच्या आधारे प्राथमिक अंदाज आहे
-
कोरोना होऊन गेलेल्या ५० टक्के लोकांना पुन्हा बाधा होईल, असे गृहीत धरून निष्कर्ष
-
व्यक्ती किंवा समूहाच्या ‘मेडीकल हिस्ट्रीनुसार’ निष्कर्ष बदलतात
Esakal