महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं श्वानप्रेम साऱ्यांनाचा ठावूक आहे. मात्र, नुकतंच त्यांच्या लाडक्या श्वानाचं निधन झालं आहे. राज ठाकरे यांच्या जेम्स नावाच्या श्वानाने सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. जेम्स हा ग्रेट डेन प्रजातीचा होता आणि गेले कित्येक वर्ष तो त्यांच्यासोबत राहत होता. (mns-chief-raj-thackeray-favorite-great-dane-dog-james-dies-of-old-age)

वयोमानामुळे जेम्सचं निधन झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र, जेम्स गेल्यामुळे राज ठाकरे अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे अनेकदा बाहेर जातांना जेम्सला सोबत घेऊन जात असतं. त्यामुळे जेम्सचं अचानकपणे निधन झाल्यामुळे त्यांना एक प्रकारे भावनिक धक्का बसला आहे.

राज ठाकरे यांना आहे श्वानांची विशेष आवड

राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन या श्वानांचं यापूर्वीच निधन झालं होतं. त्यानंतर आता जेम्सही ठाकरे परिवाराला सोडून गेला. विशेष म्हणजे राज ठाकरे व त्यांचे कुटुंबीय श्वानांवर विशेष प्रेम करतात हे अनेकदा फोटो आणि व्हिडीओमधून पाहण्यात आलं आहे. बॉन्ड, शॉन आणि जेम्सव्यतिरिक्त त्यांच्याकडे कन्या, मुसाफा (गोल्डन रिस्टरिव्हर) आणि ब्ल्यू (हस्की) हे श्वान आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here