‘तपासा दरम्यान मी अनेकांच्या संपर्कात आलो आहे…’; अनिल देशमुखांचे ED ला पत्र
मुंबई: ‘ईडी’ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १०० कोटींच्या खंडणी वसुली (100 Crores Extortion Case) प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स (Summons) बजावले. रविवारी देशमुख यांनी वेळ मागितल्यामुळे त्यांना आज (मंगळवारी) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आजदेखील अनिल देशमुख ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात चौकशीसाठी (Inquiry) हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीला पत्र (Letter) लिहून, त्यांची चौकशी किंवा जबाब (Statement) हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (Video Conferencing) माध्यमातून नोंदवून घ्यावा अशी विनंती केली. (Anil Deshmukh request ED Officials to record statement on audio visual mode regarding 100 crores Extortion Case)
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh writes to Enforcement Directorate (ED) requesting them to record “statement on audio/visual mode of any nature of your choice at whatever time convenient”
— ANI (@ANI) June 29, 2021
‘ईडी’ने अनिल देशमुख यांना सकाळी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. पण अनिल देशमुख यांच्या शारीरिक व्याधी लक्षात घेता त्यांनी चौकशीसाठी येण्यास दिला नकार दिल्याचे वकिलांनी सांगितले. तसेच, गुन्ह्यांसदर्भातील FIRची प्रत देण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी ‘ईडी’कडे केली. “आम्ही ईडीच्या कार्यालयात जात आहोत. नक्की काय काय मुद्दे आहेत ते त्यांना आम्ही विचारू. मग आम्ही अनिल देशमुखांशी चर्चा करू आणि पुढे काय करायचं ते ठरवू”, असे सांगत अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग हे ईडी कार्याल्याकडे रवाना झाले.
Also Read: ‘मुंबईकरांसमोर जगण्याचे असंख्य प्रश्न पण मुंबईचे सत्ताधारी…’

माझी २५ जूनला दीर्घ काळ चौकशी झाली आहे. माझं वय ७२ वर्षे आहे. मला अनेक शारीरिक व्याधी आहेत. कोमॉर्बिलीटीमुळे मला काळजी घेणं गरजेचं आहे. तपासा दरम्यान मी अनेकांच्या संपर्कातही आलो आहे. त्यामुळे मी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने मी चौकशीसाठी स्वत: हजर राहू शकत नाही. मी माझ्या वकिलांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून पाठवत आहे. गरज भासल्यास मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला हजर राहण्यास तयार आहे. आपणास जी वेळ योग्य वाटेल, त्या वेळेस मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चौकशीला सामोरे येण्यास तयार आहे, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
Esakal