हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस होणार असल्याने उजनी धरण जुलैमध्ये निश्‍चितपणे भरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

सोलापूर : उजनी धरणाची (ujani dam) वाटचाल आता प्लसकडे सुरू असून मागील दहा दिवसांत धरणात साडेपाच टीएमसी (TMC) पाणी (Water) जमा झाले आहे. सध्या धरणात 58.16 टीएमसी पाणी असून आणखी साडेपाच टीएमसी पाणी आल्यास धरण प्लसमध्ये येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी दिली. (in ten days five and a half TMC of water has accumulated in ujani dam)

Also Read: सोलापूर चारनंतर ‘लॉक’! जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद?

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणात गतवर्षी 28 जूनपर्यंत मायनस 18 टक्‍के पाणीसाठा होता. परंतु, सध्या उजनी धरणात मायनस 10.27 टीएमसी पाणी आहे. बंडगार्डनच्या तुलनेत दौंडमधून चांगला विसर्ग आल्याने उजनी धरणाची पाणी पातळी सुधारली आहे. पावसाळ्यापूर्वी उजनी धरणातील पाणीसाठा मायनस 21 टक्‍क्‍यांवर पोहचला होता. आता दहा टक्‍के मायनस कव्हर करण्यासाठी साडेपाच टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी धरण क्षेत्र व पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी सुधारू लागल्याचेही साळे यांनी यावेळी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस होणार असल्याने उजनी धरण जुलैमध्ये निश्‍चितपणे भरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

Also Read: सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

Ujani-Dam

पुणे व सोलापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने मागील दहा-बारा दिवसांत धरणात साडेपाच टीएमसी पाणी वाढले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणी पातळी चांगली आहे. धरणाची पातळी सध्या मायनस 10.27 टक्‍के आहे.

– धिरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सोलापूर

Also Read: सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

दौंडवरून तीन हजार क्‍युसेकचा विसर्ग

पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे दौंडमधून उजनी धरणात तीन हजार क्‍युसेकने पाणी जमा झाले. बंडगार्डनवरून खूपच कमी विसर्ग येत आहे. दरम्यान, धरणाची पाणी पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. आणखी तीन-चार मोठे पाऊस झाल्यानंतर धरणाची पाणी पातळी प्लसमध्ये येईल, असा विश्‍वास पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी व्यक्‍त केला. (in ten days five and a half TMC of water has accumulated in ujani dam)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here