दक्षिण आफ्रिकेतील बेलफास्टच्या मैदानावर सचिनने केली होती दमदार कामगिरी

मुंबई: भारतात क्रिकेटवर प्रेम असणाऱ्यांची संख्या अगणित आहे. देशात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो, तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत असंख्य विक्रमांना गवसणी घातली. त्याचे कित्येक विक्रम मोडले गेले. पण काही विक्रम अजूनही अबाधित आहेत. सध्याच्या काळात क्रिकेट सामन्यांची वाढलेली संख्या आणि बदललेले नियम यामुळे वन डे सामन्यात सहज ३०० ते ३५० धावांचा टप्पा गाठला जातो. पण सचिनच्या काळात संघाने ३०० धावांचा टप्पा गाठणं हा एक मोठा पराक्रम मानला जात असे. अशा काळात सचिनने वन डे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा पल्ला गाठला. आजच्याच दिवशी सचिनने हा पराक्रम केला. (Team India Sachin Tendulkar became first batsman to register 15,000 ODI runs On this day in 2007)

Also Read: VIDEO: हिरोला झिरो ठरवणारा आत्मघातकी गोल!

दक्षिण आफ्रिकेतील बेलफास्टच्या मैदानात २००७ मध्ये आजच्या दिवशी सामना सुरू होता. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सचिन फलंदाजीसाठी उतरला. सचिन तेंडुलकर- सौरव गांगुली जोडीपुढे २२७ धावांचे माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेने ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सचिनने वन डे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठला होता. वन डे क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा सचिन पहिलाच फलंदाज ठरला होता. मखाया एन्टीनी, अंद्रे नेल, शबालाला, जॅक कॅलीस यांसारख्या गोलंदाजांपुढे त्याने दमदार खेळ करून दाखवला होता. या सामन्यात सचिनने १०७ चेंडूत ९३ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

Also Read: T20 वर्ल्डकप भारतात नव्हे UAE ला होणार; BCCIचं शिक्कामोर्तब!

सचिन तेंडुलकर

सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सर्वप्रथम फलंदाजी केली. मॉर्ने वॅन विक या सलमावीराने ८२ धावांची उत्तम खेळी केली. पण त्याला एबी डिव्हिलियर्स, हर्शल गिब्स, जॅक कॅलीस या फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. त्यानंतर मधल्या फळीतील जेपी ड्युमिनीच्या ४० धावा आणि मार्क बाऊचरचे अर्धशतक (५५) यांच्या जोरावर आफ्रिकेने द्विशतकी मजल मारली होती. या २२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौरव गांगुलीच्या ४२, युवराज सिंगच्या नाबाद ४९, दिनेश कार्तिकच्या नाबाद ३२ धावांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. सचिनने सर्वाधिक ९३ धावा ठोकत त्या सामन्यात सामनावीराचा मान मिळवला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here