मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या एका खास प्रोजोक्टसाठी जम्मू येथे गेली आहे. सोनालीच्या या प्रोजेक्टमध्ये ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद आणि नृत्य दिग्दर्शक कुमार शर्मा देखील काम करणार आहेत. या खास प्रोजेक्टच्या शूटचे फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘पंजाबी कूडी’ या लूकमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सोनालीने कॅप्शन दिले, ‘भारतात परत येऊन आणि पुन्हा कामाला सुरूवात करून खूप मजा येत आहे.’ सोनालीच्या या खास फोटोशूटचे फोटो पाहून सोशल मीडियावर अशी चर्चा होत आहे की, ती लवकरच एका पंजाबी चित्रपटांमध्ये काम करणार आहे. पण सोनालीने तिच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल अजूनपर्यंत कोणताही खुलासा केला नाही.