पंढरपूर शहरातील विकासकामे अन श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी ऑनलाइन बैठक घेतली.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरमध्ये (pandharpur) तीर्थक्षेत्र शेगावमधील ‘आनंद सागर’ (anand sagar) प्रमाणे भव्य उद्यान व्हायला हवे, हे उद्यान उभे करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश विधानपरिषदेच्या अध्यक्षा डॉ. निलम गोऱ्हे (dr. neelam gorhe) यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. पंढरपूर शहरातील विकासकामे अन श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी ऑनलाइन बैठक घेतली. (dr. neelam gorhe said in pandharpur there should be anand sagar like shegaon)

Also Read: शिर्डी संस्थान ‘राष्ट्रवादी’कडे, पंढरपूर काँग्रेसला?

शेगाव येथील आनंद सागर उद्यान

या बैठकीत प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्याधिकारी अरविंद माळी, पत्रकार सुनील उंबरे यांनी सहभाग घेतला. पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थस्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक श्री. विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. दर्शनानंतर त्यांच्या विरंगुळ्यासाठी एक प्रसन्न, प्रशस्त आणि शांत जागा असायला हवी.

Also Read: पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी करणार प्रयत्न

शेगाव येथील आनंद सागर उद्यान

शेगावमध्ये आनंद सागर हे सुंदर उद्यान उभारले आहे. पंढरपूरमध्ये असे एक उद्यान असायला हवे. नगरपरिषदेने अशा उद्यानासाठी तातडीने एक प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले. भारतीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. श्री. जोशी यांनी मंदिराशी निगडित श्री विठ्ठल मूर्तीचे संवर्धन, रखडलेला स्कायवॉक, परिवार देवता आणि मंदिरातील डागडुजी या विषयी झालेल्या कामांची माहिती यावेळी डॉ. गोऱ्हे यांना दिली.

Also Read: पंढरपूर मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते भाविकांच्या प्रतिक्षेत!

डॉ. गोऱ्हे यांनी लॉकडाऊन पूर्वी घेतलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या विशेष बैठकीमुळे लॉकडाऊन काळात मंदिर समितीला मंदिरातील अनेक कामे करता आली, याबद्दल श्री. जोशी यांनी डॉ. गोऱ्हे यांचे आभार व्यक्त केले. मंदिराच्या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त करीत उर्वरित कामाबाबत लवकरच पुरातत्व विभागाची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.

Also Read: महूद-पंढरपूर रोडवर पकडला 63.61 लाखांचा गांजा

शेगाव येथील आनंद सागर उद्यान

प्रांताधिकारी श्री. ढोले यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला. देहू-आळंदी ते वाखरी या पालखी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. तथापि वाखरी ते पंढरपूर या मार्गाबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. वाखरी ते सरगम चौक आणि सरगम चौक ते अर्बन बँक उड्डाण पूल केल्यास वारी काळात होणारी वाहतुकीची कोंडी सुखकर होण्यास मदत होईल, या कामाबाबत केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करुन कामाला मंजुरी व निधीची उपलब्धता व्हावी, असे श्री. ढोले यांची सूचित केले.

Also Read: देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये राबवणार पंढरपूर-मंगळवेढा पॅटर्न !

त्यावर डॉ. गोऱ्हे यांनी याबाबत लवकरच केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याकडे बैठक लावून कामाचा पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले. पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. माळी यांनी चंद्रभागा नदीत जाणारे ड्रेनेजचे पाणी बंद केले असल्याचे स्पष्ट केले. प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रेटिकरण करणे, नामसंकीर्तन कामासाठी निधीची उपलब्धता, प्रदक्षिणा मार्ग आदी विषय त्यांनी उपस्थित केले.

Also Read: आशादायक ! पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे झाली कोरोनामुक्त

यावर डॉ. गोऱ्हे यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. पत्रकार श्री. उंबरे यांनी प्रदक्षिणा मार्गाचे कॉक्रीटीकरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न, दर्शन रांगेचा अर्धवट स्कायवॉक, सार्वजनिक शौचालय, चंद्रभागा नदीतीरावरील उभारण्यात आलेले निकृष्ट घाट, शहरातील खड्डेमय रस्ते आदी कामांकडे डॉ. गोऱ्हे यांचे लक्ष वेधले. वरील सर्व मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी कामांचा आढावा व पाहणी करण्यासाठी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पंढरपूर दौरा करणार असल्याचे सांगितले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here