राशिवडे बुद्रुक : ‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि जिद्द असेल, तर यश हमखास गवसेल,’ या उक्तीप्रमाणे ऑनलाईन अभ्यासासाठी (online education) हेळेवाडी-वाकीघोल (ता. राधानगरी) येथील (radhanagari) विद्यार्थ्यांनी डोंगरात फज्या मांडला आहे. या परिसरात इंटरनेट रेंज (internet) नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (sindhudurg district) येणाऱ्या डोंगरमाथ्यावरील फोर-जी रेंजचा आधार घेतला आहे. वादळ-वारा, ऊन- पाऊस, हिंस्त्र श्वापदे, किर्र जंगल याची तमा न बाळगता डोंगरमाथ्यावर झोपडी बांधून येथील युवक ऑनलाईन अभ्यास (online study) करत आहेत. निसर्गाची आणि परिस्थितीशी तोंड देत भविष्य घडवत आहेत. (students-internet-problem-working-and-study-top-hill forest-radhanagari)
ऑनलाईनला रेंज नाही, अशा ठिकाणच्या युवकांनी काय करायचे, हा प्रश्न आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील दुर्गम भागात ही समस्या गंभीर आहे. वाकीघोल परिसर, काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राधानगरी जंगलात वसलेल्या या दहा-बारा वाड्या आणि गावांची स्थिती अशीच आहे. पावसाळ्यातील चार महिने या लोकांचा जगाशी संपर्कच तुटतो. मोबाईल सेवेसाठी एकच बीएसएनएलचा टॉवर, तोही केवळ संभाषण करता. ना धड 2G ना 3G ना 4G अशा परिस्थितीत.

Also Read: ‘कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांना मराठा मुलांची चिंता आता कशी पडली?’
गेल्यावर्षी कोरोनामुळे अनेकांना घरी पाठवले यापैकीच एक पुण्यात काम करणारा महादेव जाधव. वर्क फ्रॉम होमसाठी त्याची धडपड सुरू झाली आणि मोबाईल घेऊन डोंगर माथ्यावरून फिरताना त्यांच्या मोबाइलने सिंधुदुर्गवरून येणारी रेंज पकडली. गावापासून दीड किलोमीटर उंच डोंगरावर त्यांचा दिनक्रम सुरू झाला. हीच पायवाट पकडून महादेव पाठोपाठ परिसरातील युवक या डोंगरावर अभ्यासासाठी जाऊ लागले. पावसाळा सुरू झाल्याने परिस्थिती बिकट झाली. झाडाखाली बसून धडे गिरवणे सोपे नाही. म्हणून सर्वांनी मिळून झोपडी बांधली आणि या झोपडीत येणाऱ्या रेंजच्या आधारे काम सुरू केले. कोण कंपनीची काम करतोय, तर कोण बारावीचा अभ्यास करतोय. काही मुलांनी स्पर्धा परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून भविष्य घडवू लागली आहेत.
“परिसरात मोबाइल सुविधा चांगली मिळावी व लोकांची सोय व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. बीएसएनएलचा टॉवर आहे, मात्र त्याची सेवाही व्यवस्थित नाही. इथल्या युवकांचा विचार करून शासनाने शाश्वत पाऊल टाकावे.”
– संतोष कामते, बागलवाडी
Also Read: कोरियन स्पायसी चिकन करा ट्राय

मी पुण्यातील कंपनीचे काम करतो, मात्र रेंज नसल्याने डोंगरावर येणाऱ्या रेंजचा आधार घेत धडपडत आहे. ही बिकट परिस्थिती थांबवण्यासाठी शासनाने मार्ग काढावा.
– महादेव जाधव, हेळेवाडी.
Esakal