मुंबईत उपचारांसाठी तरूणाने गाठलं जवळपास 6,600 किमीचे अंतर

मुंबई: कॅमरूनमधील 80 टक्के भाजलेल्या रुग्णावर मुंबईतील डाॅक्टरांनी यशस्वी उपचार केले आणि त्यामुळे त्या 31 वर्षीय तरुणाला जीवदान मिळाले. या तरुणाने मुंबईत उपचारांसाठी जवळपास 6,600 किमीचे अंतर पार केले. हा तरुण मुंबईतील एकासुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला आणि त्याच्यावर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. पीटर एसोंबा असं या तरूणाचं नाव असून त्याला वेळेवर उपचार मिळावे यासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाने चीन, कॅमेरून आणि नायजेरिया येथील आंतरराष्ट्रीय दूतावासांशी संपर्क साधून त्याचे प्राण वाचवले. (Mumbai doctors successfully saved life of 31 years old youth from abroad who was 80 percent burnt)

Also Read: “पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना?”; अनिल देशमुखांना सवाल

कॅमरूनमधील कोको फॅक्टरीमध्ये स्फोट होऊन पीटरचा चेहरा 50 टक्के भाजला. तर टाळू 80 टक्के भाजला. सतत सुरू असलेल्या स्थानिक दंगली आणि अपुऱ्या वैद्यकीय सेवा यांमुळे पीटरला गेले पाच महिने योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नव्हती. अखेर, कुटुंबीय आणि मित्र यांच्यासह चर्चा केल्यानंतर पीटरने नानावटी रुग्णालयाशी संपर्क साधला. ‘चेहरा व टाळूवरच्या जखमा उघड्या असूनही रुग्णाला गंभीर स्वरुपाचा संसर्ग झाला नव्हता. लगेचच प्लास्टिक सर्जन, न्यूरोसर्जन, भूलतज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर स्पेशॅलिस्टची टीम तयार केली आणि उपचारांचे नियोजन केले.”, असे हॉस्पिटलचे सल्लागार प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन डॉ. पराग विभाकर यांनी सांगितले.

पीटर एसोंबा

चेहरा भाजल्यामुळे आणि त्यावरील जखमांमुळे रुग्णाच्या चेहऱ्याची ओळख पटू शकत नव्हती. परिणामी पीटरला पासपोर्ट मिळवणे शक्य होत नव्हते. त्यामुळेच, रुग्णालयाने चीनमधील कॅमेरूनच्या दूतावासाशी संपर्क साधला. त्यांना रुग्णाच्या स्थितीची माहिती दिली आणि त्याला पासपोर्ट लवकरात लवकर मिळवून द्यावा, अशी विनंती केली. कागदपत्रे तयार करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी गेल्यानंतर पीटर रुग्णालयात दाखल झाला. त्यानुसार, रुग्णाच्या चेहऱ्यावरील आणि कवटीवरील उघड्या जखमांचे उपचार करण्याला डाॅक्टरांनी प्राधान्य दिले. पापण्या नसल्यामुळे आणि दीर्घकाळ शुष्कपणा राहिल्याने रुग्णाचा डावा डोळा अपारदर्शक झाला होता. पीटरची अवस्था वाईट झाल्याने त्याला जेवताही येत नव्हते.

Also Read: शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज? संजय राऊतांनी दिलं उत्तर

दोन महिन्यांच्या कालावधीत टीमने त्वचेचे ग्राफ्टिंग (कलम) करून चेहऱ्यावरील जखमांवर उपचार करणे आणि कवटीवरील जखमांवर उपचार करणे आणि डावा डोळा व ओठांची पुनर्रचना करणे, या शस्त्रक्रिया केल्या. रुग्णाच्या पुढील भेटींच्या वेळी ही टीम गुंतागुंतीची कॉर्निअल ट्रान्स्प्लांटची शस्त्रक्रिया आणि त्वचेचे ग्राफ्टिंग करून नाकाच्या रचनेत सुधारणा करणार आहे. ‘त्याला झालेली इजा गंभीर स्वरुपाची होती आणि चेहऱ्याचे बरेचसे नुकसान झाले होते. पण, त्याचे जीवन पूर्वपदावर यावे, यासाठी टीम प्रयत्नशील आहे’, असे डॉ. विभाकर यांनी सांगितले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here