‘आता माझी सटकली…’सिंघम रिटर्न्समधलं हे गाणं आठवतंय का? अनेकदा मस्करी करता करता एखाद्याला राग आला तर हे वाक्य हमखास म्हटलं जातं. मात्र, थायलँडमध्ये एका तरुणीने राग आल्यावर खरंच काय होतं हे करुन दाखवलं आहे. या तरुणीने रागाच्या भरात चक्क बॉयफ्रेंडची २३ लाखांची बाईक जाळून टाकली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे.(thai-woman-sets-ex-boyfriends-rs-23-lakh-bike-on-fire)

सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेला प्रकार थायलँडमध्ये घडला आहे. ३६ वर्षीय कनोक वान(Kanok Wan) आणि तिच्या प्रियकराचा ब्रेकअप झाला होता. मात्र, पूर्वीचं सगळं विसरुन पुन्हा एकत्र येऊयात असं कनोक तिच्या बॉयफ्रेंडला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, कनोकच्या समजावण्यानंतरही तिचा एक्स बॉयफ्रेंड काही केल्या ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात कनोकने बॉयफ्रेंडची २३ लाखांच्या बाईकला आग लावली. विशेष म्हणजे ही बाईक कनोकनेच तिच्या बॉयफ्रेंडला भेट म्हणून दिली होती.

Also Read: …तर समजा तुम्ही बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडलात

Also Read: सिलेंडर मॅनच्या नावामागचं कोडं उलगडलं

Also Read: कोरियन स्पायसी चिकन करा ट्राय

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये कनोक पार्किंग एरियामध्ये उभी होती. त्यानंतर तिने एक्स बॉयफ्रेंडच्या बाईकवर पेट्रोल टाकलं आणि आग लावली. त्यानंतर स्वत:च्या कारमध्ये बसून निघून गेली. विशेष म्हणजे या आगीची माहिती मिळाल्यानंतर तात्काल अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. नाही तर या बाईकसोबत इतरही गाड्यांचं नुकसान झालं असतं.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कनोकला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची अधिक चौकशी सुरु असल्याचं सांगण्यात येतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here