कोल्हापूर : वर्षा पर्यटनासाठी अनेकजण डोंगरदऱ्या, जंगल सफारी, गड-किल्ल्यांची सैर करतात. शिवाय पर्यटनासाठी विविध धबाधब्यांनाही आवर्जून भेटी दिल्या जातात. अनेकजण रांगणा, रायगड, सिंहगड, वासोटा अशा किल्ल्याच्या ट्रेकचा प्लॅन करतात. मात्र अशावेळी काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. राज्यसरकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच पर्यटनाच्या ठिकाणांना आणि किल्ल्यांवरील सफारीचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी बंद असणारा दुर्गराज रायगड आणि रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. मात्र यासंदर्भात सुरक्षितेतच्या दृष्टीने संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करुन पर्यटकांना आवाहन केले आहे.

ते म्हणतात, कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी बंद असणारा दुर्गराज रायगड नुकताच रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला आहे. मात्र रायगडावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचढणीच्या मार्गावर मोठमोठे दगड कोसळतात. तसेच पाण्याचा तीव्र प्रवाह पायरी मार्गावरून वाहत असतो. अशा परिस्थितीत गड पायी चढणे अत्यंत धोकादायक होऊ शकते. हे दगड हटविण्याचे काम प्राधिकरणाच्या वतीने सुरूच आहे. तथापि, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे. त्यांनी ट्वीटमधून पर्यटक, ट्रेकर्स यांना पावसाळ्यात गड पायी चढू नये असे आवाहन केले आहे.

Also Read: कोकण कन्येची भरारी; आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील 10 प्रतिभावंतांमध्ये स्थान

दरम्यान वर्षा पर्यटनासाठी आता अनेक ठिकाणे सुरु होत आहेत. काही जिल्ह्यातील पर्यटनासह कोणतेच निर्बंध शिथिल केलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी बाहेर जात असल्यास योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here