महाबळेश्वर (सातारा) : महाबळेश्वर शहरापासून (Mahabaleshwar city) दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजणवाडीत भरदिवसा घरफोडीची घटना घडली. नुरमोहंमद नजीर मुलाणी (वय 55) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात असणाऱ्या कपाटातील रोख 45 हजार व एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात (Mahabaleshwar Police Station) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून भरदिवसा झालेल्या या घरफोडीच्या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. (Theft Of Money From Nurmohammad Mulani House In Mahabaleshwar Satara Crime News)
महाबळेश्वर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजणवाडीत भरदिवसा घरफोडीची घटना घडली.
नुरमोहंमद यांची मुलगी परळी (ता. जि. सातारा) येथे राहते. तिच्या घरी असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी नुरमोहंमद यांनी 28 जून रोजी सकाळी दहा वाजता आपल्या घरातील सर्व सदस्यांना सोबत घेवून निघाले. बाहेर पडताना घराला व्यवस्थित कुलूप लावले होते. तेथून सायंकाळी पुन्हा नुरमोहंमद हे आपल्या घरी आले, तेव्हा आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटे आत शिरले. त्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम 45 हजार रूपये लांबविले. नुकतेच मुलीचे लग्न झाले होते. त्या मुलीच्या लग्नात (Wedding Ceremony) मिळालेल्या आहेराची ती रक्कम होती, असे नुरमोहंमद यांनी सांगितले.
Also Read: जावळीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चोरटे घरातील वरच्या मजल्यावर देखील गेले होते. तेथे त्यांना काही चीज वस्तू मिळाल्या नाही, परंतु त्या शोधण्यासाठी त्यांनी घरातील सामानाची नासधूस केली होती. घराच्या हॉलमध्ये व बेडरूममध्ये सर्वत्र सामान अस्ताव्यस्त पसरले होते. रात्री उशीरा नुरमोहंमद यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली. आज महाबळेश्वर पोलिसांनी चोरीच्या तपासासाठी श्वानपथक व हस्तरेषा तज्ञांना पाचारण केले होते. तज्ञांनी सर्व नमुने हस्तगत केले आहेत. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे रांजणवाडीत चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा तपास करण्याचे आव्हान महाबळेश्वर पोलिसांसमोर असून पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास सुरू आहे.
Theft Of Money From Nurmohammad Mulani House In Mahabaleshwar Satara Crime News
Esakal