जगातील क्वचितच असा कोणी असेल, ज्याला चीनच्या भिंतीविषयी माहिती नसेल. जगभरातून अनेक पर्यटक (Tourists) ही भव्य भिंत पाहण्यासाठी येत असतात. असं म्हणतात, की ही भिंत अंतराळातूनही स्पष्ट दिसते. ह्या भिंतीला ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ (The Great Wall of China) म्हणूनही ओळखलं जातं, तर कुणी याला चीनची महान भिंत म्हणूनही संबोधतात. जगातील आश्चर्यांमध्ये चीनच्या भिंतीचा समावेश आहे, तर युनेस्कोनंही (UNESCO) या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय. या भिंतीच्या बांधकामाची कहाणी दोन-चारशे वर्षांची नाही, तर हजारो वर्ष जुनी आहे. (Know Interesting Facts About China Wall Known As World Largest Cemetery Global News)

जगातील क्वचितच असा कोणी असेल, ज्याला चीनच्या भिंतीविषयी माहिती नसेल. जगभरातून अनेक पर्यटक (Tourists) ही भव्य भिंत पाहण्यासाठी येत असतात.

ही भिंत बांधण्याची कल्पना चीनचा पहिला सम्राट किन शी हुआंग (Qin Shi Huang) याने केली होती, परंतु त्याच्याकडून ही भिंत पूर्ण होऊ शकली नाही. त्याच्या मृत्यूनंतर शेकडो वर्षांनी या भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. असे मानले जाते, की त्याचे बांधकाम इ.स.पू. पाचव्या शतकात सुरू झाले, जे 16 व्या शतकापर्यंत चालत होते. त्यामुळे आपल्याला कल्पना आलीच असेल, की ही भिंत एका राजाने बांधली नाही, तर ती वेग-वेगळ्या चीनी राजांच्या देखरेखीखाली बांधण्यात आली. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या भिंतीला ‘जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी’ देखील म्हटलं जातं.

Also Read: भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरं माहिती आहेत?, जिथं करोडोनं येते देणगी

सुरक्षेच्या दृष्टीनं निर्माण केली गेलेली ही भिंत खूप लांब आहे. मात्र, याच्या लांबीबाबत अनेक वेगवेगळे दावे केले जातात. एका पुरातत्व सर्वेक्षणानुसार, 2009 मध्ये या भिंतीची लांबी 8,850 किलोमीटर इतकी होती, परंतु 2012 मध्ये चीनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात हे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. त्या सर्वेक्षणात चीनच्या भिंतीची एकूण लांबी 21,196 किमी असल्याचे स्पष्ट झाले. तर भिंतीची रूंदी इतकी आहे, की एकावेळी ५ घोडेस्वार किंवा १० सैनिक इथं फेऱ्या मारू शकतात. चीनच्या अग्रगण्य ‘शिन्हुआ’ वृत्तपत्रात या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता.

China Wall

असे म्हणतात, की ही भिंत चीनला शत्रूपासून संरक्षण देण्यासाठी बांधली गेली होती. पण, तसे होऊ शकले नाही. 1211 मध्ये मंगोल शासक चंगेज खान (Genghis Khan) याने एकाच ठिकाणी भिंत तोडली आणि ती पार करुन चीनवर हल्ला चढवला होता. चीनमध्ये ही भिंत ‘वान ली चांग चांग’ म्हणून ओळखली जाते. चीनची भिंत जगभरात मनुष्याद्वारे बनवली गेलेली सर्वात लांब रचना आहे. युनेस्कोनं १९८७ मध्ये जागतिक वारशांच्या सूचीमध्ये चीनच्या भिंतीचा समावेश केला आहे.

Also Read: मध्य प्रदेशशी संबंधित या मनोरंजक तथ्यांबद्दल माहिती आहे?

Wall of China

चीनच्या ग्रेट वॉलशी संबंधित अनेक कथा आहेत. असं म्हणतात, की या विशाल भिंत बांधणीत सुमारे 20 लाख मजूर गुंतले होते, त्यापैकी सुमारे 10 लाख लोकांनी या इमारतीत आपला प्राण गमावला. अशा स्थितीत, मृतांना भिंतीच्या खालीच पुरण्यात आले. म्हणूनच, चीनच्या या महान आणि विशाल भिंतीला जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी देखील म्हटले जाते. तथापि, यामध्ये किती सत्य आहे, हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे आजही या भिंतीविषयी ‘रहस्य’च आहे. किलेनुमा निर्मित या भिंतीवरून दुरूनच शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी मिनार बनवले गेलेत. १९७० साली पर्यटकांसाठी ही भिंत खुली करण्यात आली. दरवर्षी इथं जवळपास दीड कोटी पर्यटक भेट देतात, अशी माहिती आहे.

Know Interesting Facts About China Wall Known As World Largest Cemetery Global News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here