कऱ्हाडपासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर सदाशिवगड आहे. सदाशिवगड हा अफझल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ताब्यात आला. कऱ्हाडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कऱ्हाडहुन पलूस-विटाकडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सदाशिवगड बांधून घेतला.

कऱ्हाडपासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर सदाशिवगड आहे. संपुर्ण गड फिरण्यास साधारणतः अर्धा तास लागताे.
सदाशिवगडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी-हजारमाची येथुन त्या गडावर जाता येते. तेथे जाण्यासाठी सुमारे 983 पायऱ्या आहेत. त्याचबरोबर राजमाची-बाबरमाची आणि वनवासमाची येथूनही वेगवेगळे मार्ग आहेत. रस्त्याकडेची झाडी मनमोहुन टाकते.
सदाशिवगडावरील महादेव मंदिर
सदाशिवगडावर महादेवाचे प्रशस्त मंदिर आहे. तिथे भाविकांचा नेहमी गर्दी असती.
मंदिरातील महादेवाची आकर्षक पिंड
किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी झटणाऱ्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान व गडप्रेमींच्या सहकार्याने गडावर सदाशिव गार्डन साकारण्यात आली आहे.
सदाशिवगडावरुन दिसणारे विहंगम दृश्य
सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानसह निस्वार्थ भावनेने सदाशिवगड संवर्धनात मोलाचे सहकार्य करणाऱ्या शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या मावळ्यांकडून गडावर ध्वजपुजन करण्यात येते.
गडावरील चौकोणी चिंच विहीरीत १२ महिने पाणी असते.
सदाशिवगड संवर्धनासाठी झटणारे सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे मावळे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here