औरंगाबाद : सध्या औरंगाबाद Aurangabad शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा Corona Vaccination तुटवडा निर्माण झाला आहे. आज बुधवारी (ता.३०) फक्त तीनशे जणांना लस दिली जाणार असल्याचे महापालिकेकडून Aurangabad Municipal Corporation सांगण्यात आले होते. सिडकोतील प्रोझोन माॅल येथे लसीसाठी नागरिकांनी सकाळपासून गर्दी केल्याचे दिसत आहे. दुपारपर्यंत लसीकरणाला सुरुवात झालेली नव्हती. नागरिकांनी प्रोझोन माॅल लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे. यावेळी रेटारेटीचा प्रकार पाहायला मिळाला.
दुसरी डोस येथे
आज कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या डोससाठी क्रांती चौक आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्र आणि एमआयटी हाॅस्पिटल सिडको एन-४ येथे दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Also Read: Aurangabad : औरंगाबादेत आज फक्त तीनशे जणांना मिळणार लस
एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी घेतली लस
गेल्या आठवड्यात एक लाख १५ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. शहरात ९६ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. महापालिकेकडे पुरेसा लसींचा साठा नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे.
Esakal