राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवत तीन प्रश्नांची विचारणा केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 23 जून 2021 रोजी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी राज्यपालांकडे निवेदन सादर करण्यात आलं होतं. त्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारणा केली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी पत्र पाठवत. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, अधिवेशनाचा कालावधी आणि OBC आरक्षणाबद्दल सरकारला विचारणा केली आहे. उपरोक्त विषय अत्यंत महत्वाचे असल्यामुळे याबाबत आपण कार्यवाही करावी व मला त्याबाबत अवगत करावे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन का? अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक का घेतली जात नाही? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

Also Read: केंद्र सरकारने बदलला ५० वर्षापूर्वीचा पेन्शनचा नियम

‘गंभीर बाब म्हणजे, राज्यपालांनी स्वत: पत्र दिल्यानंतर सुद्धा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळली जात आहे. आपल्या पत्रानंतर निवडणूक घेणे हे घटनात्मक बंधन होते. घटनात्मक निर्देश तंतोतंत पाळणे ही सरकार आणि विधिमंडळाची जबाबदारी असते. पण, त्याचे पालन होत नसल्याने, राज्यातील घटनात्मक व्यवस्था कोलमडल्याबाबत अहवाल आपण राष्ट्रपतींना पाठवावा, अशी मागणीही भाजपने आपल्या पत्रात केली होती. त्यामुळे आता राज्यपाल काय भूमिका घेतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here