अभिनेता रणवीर सिंग त्याच्या दमदार चित्रपटांबरोबरच वेगवेगळ्या लूक्समुळे सतत चर्चेत असतो.
नुकतंच रणवीरने त्याच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. रणवीरचे हे फोटो पाहून चाहत्यांपासून सेलिब्रिटीसुद्धा अवाक् झाले आहेत. गळ्यात सोन्याची भलीमोठी चेन, पिवळ्या रंगाचा चष्मा, लांब केस आणि जॅकेट अशा भन्नाट लूक मधील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींनी रणवीरच्या या लूकचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्यावर भन्नाट मीम्स व्हायरल केले आहेत. आलिया भट, सिद्धार्थ जाधव, अर्जुन कपूर या कलाकारांनी त्याच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.