नागपूर : चिखलदरा हे विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. थंड हवेचे ठिकाण म्हणून हे राज्यात प्रसिद्ध आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात सर्वाधिक पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. आता याच ठिकाणी जगातील तिसरा आणि भारतातील पहिला सिंगल रोपवे स्कायवॉय तयार होत आहे. (India first sky walk at chikhaldara)

चिखलदरा सातपुडा पर्वत रांगेत वसलेले आहे. येथील नागमोडी रस्ते, थंड हवा, रिमझिम पाऊस आणि शेजारीच असलेलला मेळघाट व्याघ्र प्रकल्प यामुळे चिखलदऱ्यात पर्यटकांचा ओढा असतो. आता स्कायवॉकमुळे चिखलदऱ्याच्या पर्यटनामध्ये आणखी भर पडणार आहे.
चिखलदऱ्यातील स्कायवॉक हा ४६० मीटर लांबीचा असून जगातील पहिला सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक ठरणार आहे.
चिखलदऱ्यातील गोराघाट पॉईंटपासून तर हरिकेन पॉईंटपर्यंत 450 मीटरचा हा स्कायवॉक असणार आहे. आता खासदार नवनीत राणा यांनी या स्कायवॉकचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
हा चीनमधील स्कायवॉक असून तो ३६० मीटर लांबीचा आहे.
हा स्वित्झर्लंडमधील स्कायवॉक असून तो ३९७ मीटरचा आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here