

सध्या बाजारात अनेक रंगाच्या, कंपनीच्या लिपस्टिक पाहायला मिळतात. अनेक जणी ‘जस्ट ट्राय’ म्हणून लिपस्टिक वापरतात. अनेकदा या वापरत असताना त्यांचा ब्रँड किंवा क्वालिटीदेखील पाहिली जात नाही. त्यामुळे अनेकदा त्याचा ओठांवर परिणाम होतो. ओठांचा मूळ रंग बदलतो आणि त्यावर काळे पडतात.

सतत ओठांवर लिपस्टिकचा मारा केलामुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. लिपस्टिक तयार करताना अनेक केमिकल्स वापरले जातात. यामुळे ओठांचा ओलावा नष्ट होतो.

आज काल लायनर म्हणूनदेखील लिपस्टिकचा वापर केला जात आहे. अनेक कंपन्या लिपस्टिक प्लस लायनर अशा डबल युज करणारे प्रोडक्ट तयार करत आहेत. परंतु, डोळे हे सेन्सेटिव्ह असतात. त्यामुळे डोळ्यांच्या संपर्कात एखादा केमिकलयुक्त पदार्थ गेला तर लगेच डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. अनेकदा लिपस्टिकचा लायनर म्हणून वापर केला तर डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

अनेकदा जेवताना, पाणी पितांना लिपस्टिकमधील बारीक कण अन्नावाटे किंवा पाण्यावाटे शरीरात जात असतात. त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता असते.

लिपस्टिक किंवा कोणतेही सौंदर्यप्रसाधन तयार करताना त्यात केमिकलचा वापर केलेला असतो. त्यातच अनेकांची स्किन प्रचंड सेन्सेटिव्ह असते. त्यामुळे अशा मुलींनी किंवा स्त्रियांनी केमिकलयुक्त लिपस्टिक वापरली तर त्यांच्या ओठांभोवती अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
Esakal