जर तुम्ही दक्षिण भारताला भेट देण्याचा विचार करीत असाल तर या वेळी तुम्ही केरळमधील कुमारकोम जिल्ह्यातील या सुंदर ठिकाणाचा विचार करू शकता. दक्षिण-भारतातील केरळ हे राज्य अजूनही भारतासह परदेशी पर्यटकांच्या प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक केरळ येथे दर्शनासाठी विशेषत: मुन्नारसारख्या सुंदर ठिकाणांना भेट देण्यासाठी येतात. पण, केरळमध्ये मुन्नारशिवाय अजून खुप अशी ठिकाणे आहेत जेथे तुम्ही जाऊ शकता.
केरळमधील कोट्टायमपासून सुमारे 16 कि.मी. अंतरावर असणारे कुमारकोम सौंदर्याच्या बाबतीत मुन्नारपेक्षा कमी नाही. येथील आश्चर्यकारक दृश्ये आपल्याला नक्कीच नंदनवनापेक्षा कमी वाटणार नाहीत. आज या लेखात आम्ही तुम्हाला कुमारकोममधील काही प्रमुख पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत, जिथे आपण आपल्या मित्र, कुटूंब किंवा पार्टनर सोबत कधीही भेट देऊ शकता.(kerala-kumarakom-district-tourism-tips-marathi-news)

कुमारकोम बरोबरच दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध तलाव म्हणजे वेम्बनाड झील. मध्यभागी असलेला तलाव आणि आजूबाजूला नारळाची झाडे आणि भातशेती ही जागा पर्यटकांसाठी खास आकर्षित ठरते. केरळमध्ये रोमँटिक सहलीसाठी भेट देण्याकरिता जर आपण एखादे सुंदर ठिकाण शोधत असाल तर यासारखे दुसरे कोणतेही सुंदर ठिकाण नाही. नवीन वर्षामध्ये आपण येथे भेट देण्यासाठी देखील जाऊ शकता.

नैसर्गिक सौंदर्याबरोबरच कुमारकोममधील पक्षी अभयारण्यसुद्धा पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. केरळमधील वेम्बनाड तलावाच्या काठी वसलेल्या कुमारकोम पक्षी अभयारण्यात हजारो पक्ष्यांच्या प्रजातींचे घर आहे. तुम्ही जर पक्ष्यांसह निसर्गप्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही पर्वणीच ठरेल. येथे आपण तिकिट घेऊन सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या दरम्यान कधीही फिरायला जाऊ शकता.

जर तुम्हाला केरळ सोबत कुमारकोमची संस्कृती जाणून घ्यायची असेल तर, तुम्ही कुमारकोम क्राफ्ट संग्रहालयात पाहू शकता. येथे आपल्याला हस्तकलेच्या लाकडी वस्तू, सजावटीच्या वस्तू आणि पेंटिंग्जपासून प्राचीन वस्तूंची उत्तम नमुने पाहायला मिळतील. इतकेच नाही तर तुम्हाला इतिहासामध्ये रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी खास ठरेल. येथून तुम्ही घर सजवण्यासाठी वस्तू देखील खरेदी करू शकता.

केरळमधील कुमारकोममध्ये सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे कुमारकोम बीच आहे. हा समुद्रकिनारा कुमारकोमसह केरळमधील सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे बीच खासकरुन हनिमून डेस्टिनेशन म्हणून देखील ओळखले जाते.स्वच्छ पाण्याजवळ असणारी शानदार रेस्टॉरंट्स आणि सुंदर रोमँटिक रिसॉर्ट्स त्यास अधिक विशेष बनवतात. दरम्यान, तुम्ही या बीचवर वाटर स्पोर्ट्स एन्जॉय देखील करू शकता.नक्कीच कुमारकोमच्या या ठिकाणांना भेट दिल्यानंतर, ही सहल आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि संस्मरणीय क्षणांमध्ये समाविष्ट केली जाऊ शकते.
Esakal