
उन्हाळ्यामध्ये हाताला घाम येणे ही नेहमीची बाब आहे. मात्र प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. जर तुमच्या हाताला खूप जास्त घाम येत असेल तर तुम्हाला या घरगुती टिप्सचा नक्कीच फायदा होईल.

सेजच्या वापरासाठी याची पाने काढा आणि ती उन्हात वाळवून पावडर करून घ्या. एका स्वच्छ कपड्यात ही पावडर टाकून हाताच्या तळव्यावर ठेवून द्या. ही पावडर घाम येण्यावर नियंत्रण ठेवते. याचा गुण असा आहे की ही पावडर त्वचेवरील तेलाला काढून टाकतो.

तुम्ही सफरचंदाच्या विनेगर ने हाताला पुसून घ्या. ते रात्रभर तसेच राहू द्या. तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये रोज दोन चमचे याचा वापर करू शकता. तुमच्या शहरातील पीएच बॅलन्स नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. शिवाय हाताचा घाम कमी करण्यास मदत करतो.

टाल्कम पावडर हातावरती चोळून द्या. काही वेळ हातावरती पावडर तशीच ठेवून द्या. टाल्कम पावडर हाताचा मऊ पणा टिकवून ठेवते. आणि घामाला कोरडे करण्यास मदत करते.

अल्कोहोलमध्ये कापसाच्या बोळा बुडवून तो हातावरती चोळून द्या. काही तासातच हाताचा घाम सुकून जातो. मात्र याचा जास्त वापर हाताला कोरडेपणा आणू शकतो. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच वापर करा.

कच्च्या बटाट्याचे स्लाईस कापून हातावर चोळून घ्या. आणि काही वेळ हाताच्या तळव्यावर ठेवून द्या. काही दिवसातच हातावर घाम यायचे कमी होईल.

Esakal