England Women vs India Women 2nd ODI : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. पहिल्या वनडे सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिलांना मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. इंग्लंडची कर्णधार हेथर नाईट हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय महिला पुन्हा एकदा इंग्लंड महिलांना टार्गेट देतील. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मोठी धावसंख्या उभारण्याचे चॅलेंज भारतीय महिलांसमोर असेल. (England Women vs India Women 2nd ODI Smriti Mandhana Shafali Verma Jemimah Rodrigues Mithali Raj Harmanpreet Kaur)

145-4 (33.5) : हरमनप्रित कौरने सोडली मितालीची साथ, केट क्रॉसला तिसरे यश. कर्णधार-उप कर्णधार दोघींनी मिळून 68 धावांची भागीदारी केली.

77-3 (16.4) सेट झालेली शफालीही परतली, इक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर जोन्सचं अप्रतिम स्टंपिंग. शफालीनं 55 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने केली 44 धावांची खेळी

76-2 (15.4) : जेमिमा रॉड्रिग्जच्या रुपात भारतीय संघाला दुसरा धक्का, कॅट क्रॉसलाच मिळाले दुसरे यश

56/1 (11.5) : कॅट क्रॉसने स्मृती मानधनाला केलं बोल्ड, तिने 30 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 22 धावांची खेळी केली

भारतीय संघ तीन बदलासह मैदानात उतरला आहे. पहिल्या सामन्यात बाकावर बसलेल्या स्नेह राणा, पूनम यादव आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना संघात स्थान मिळाले आहे.

इंग्लंड महिला संघाची कर्णधार हेथर नाईट हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here