भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिची आसाम सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. द्युती चंद हिने ऑलिम्पिकसाठीही पात्रता सिद्ध केलीये.
भारतीय राष्ट्रीय रायफल संघ (एनआरएआय) ने राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी डबल ट्रॅप विश्व चॅम्पियन अंकुर मित्तल याची निवड केली आहे.
महिला गटातून भारतीय राष्ट्रीय रायफल संघाने (एनआरएआय) ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या अंजुम मोदगिल हिच्या नावाची शिफारस केली आहे.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (AFI) आगामी ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारातील प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) च्या नावाची शिफारस राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी केलीये.
भारतीय तिरंदाजी महासंघाने (एएआय) विश्व कप स्पर्धेत तीन वेळा रौप्य पदक जिंकलेल्या ज्योति कुमारीची निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयने महिला गटातून भारतीय वनडे आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राजच्या नावाला पसंती दिलीये. तिने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्ष खेळण्याचा टप्पा पार केलाय.
भारतीय टेबल टेनिस महासंघाने (टीटीएफआय) राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी अचिंत शरत कमल याची निवड केलीये. तो चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्वही करताना दिसणार आहे.
भारतीय कसोटी संघातील नियमित सदस्य आणि सातत्याने दमदार कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विन याच्या नावाची देखील बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
भारतीय गोल्फ संघाने दोन वेळा बार के युरोपीयन टूरमधील विजेता शुभंकर शर्माच्या नावाची प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केलीय.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून (एआयएफएफ) देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी सुनील छेत्रीच्या नावाची शिफारस केली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here