नाशिक : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात चांगलाच गाजत असतानाच याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. (maratha-activist-protest-against-ajit-pawar-nashik-marathi-news)

अजित पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मराठा कार्यकर्ते अजित पवारांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र पोलिसांनी ताफा येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.काही दिवसांपूर्वी बीडमध्येही वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांची गाडी अडवली होती. गाडी समोर झोपण्याचा प्रयत्न या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here