कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कल टप्प्या टप्याने बाहेर येऊ लागला आहे. या निवडणुकीत प्राथमिक टप्प्यात म्हणजे मतमाेजणीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी सहकार पॅनेल यांनी आरक्षित गटात निर्णायक आघाडी घेतली आहे. (krishna-sugar-factory-election-2021-result-live-update-1-pm)
या निवडणुकीची मतमोजणी कऱ्हाड येथे दहा वाजता सुरू झाली. मतदान केंद्र निहाय मोजणी सुरू आहे. प्राथमिक कल सत्ताधारी सहकार पॅनेलकडे असल्याचे दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट झाले आहे. संस्थापक व रयत पॅनेलची आकडेवारी कमी जास्त होत आहे. एकूण 74 टेबलवर मतमोजणी सुरू असून दोन फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होईल. दुसऱ्या फेरीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे सद्यस्थितीत सत्ताधारी सहकार पॅनेलच्या बाजूने कल दिसून येत आहे. सध्या मतमाेजणीची पहिली फेरी सुरु आहे.
Also Read: Krishna Election Result Live : मतमाेजणी प्रक्रियेस प्रारंभ
इतर मागास प्रवर्ग गट
एकूण मते 17294
वैध मते 16957
अवैध मते 337
मिळालेली मते
सहकार पॅनेलचे वसंतराव शिंदे 10185
संस्थापक पॅनल मिलींद पाटणकर 4633
रयत पॅनल शंकरराव रणदिवे 2198
पहिल्या फेरीत इतर मागास प्रवर्गात गटांमध्ये सहकार पॅनलची 5552 मतांची आघाडी

भटक्या जाती जमाती प्रवर्ग गट
एकूण मते 16694
वैध मते 16615
अवैध मते 379
मिळालेली मते
सहकार पॅनेलचे अविनाश खरा 10180
संस्थापक पॅनल नितीन खरात 4568
रयत पॅनल आनंदराव मलगुंडे 2130
पहिल्या फेरीत इतर मागास प्रवर्गात गटांमध्ये सहकार पॅनलची 5612 मतांची आघाडी
Also Read: काेण आहे नाराज? उदयनराजे
अनुसूचित जाती जमाती
एकूण मते 17290
वैध मते 16968
अवैध मते 322
मिळालेली मते
सहकार पॅनल विलास भंडारे 10169
संस्थापक पॅनल शिवाजी आवळे 4623
रयत पॅनल अधिकराव भंडारे 2176
पहिल्या फेरीत अनुसूचित जाती जमाती गटांमध्ये सहकार पॅनलची 5546 मतांची आघाडी
Esakal