जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी तर केंद्र शासनाने व राज्य शासनाचे ८०० कोटी असा ८६० कोटी रूपयांचा पिकविमा भरलेला असुन त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रूपयेच मिळाला आहे.
माजलगाव (जि.बीड) : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील Beed शेतकऱ्यांना पिकविम्यापासुन Crop Loan वंचित रहावे लागत आहे. शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा. यासाठी शासनाने अॅग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनी आॅफ इंडिया Agriculture Insurance Company Of India या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना Farmer पिकविमा मिळालेला नाही. या मागणीसाठी तालुक्यातील खतगव्हाण येथे चुलबंद आंदोलन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी (ता.एक) करण्यात आले. तालुक्यातील खतगव्हाण येथे पिकविमा मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी चुलबंदची हाक दिली होती. कृषीदिन व संत जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाचा दिवस आहे. तुकाराम महाराजांची पालखी आज प्रस्थान करत असते. त्याचाच एक भाग म्हणुन पात्रुड व कान्सुर येथील दोन दिंड्या एकत्र येत खतगव्हाणमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२०-२१ चा विमा मिळावा या मागणीसाठी चुलबंद आंदोलन करत गावातुन दिंडी काढत अनोखे आंदोलन केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी तर केंद्र शासनाने व राज्य शासनाचे ८०० कोटी असा ८६० कोटी रूपयांचा पिकविमा भरलेला असुन त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रूपयेच मिळाला आहे. शेतकऱ्यांनी या प्रकरणी वेगवेगळे आंदोलन केले Majalgaon असले तरी शासनाने मात्र कसल्याही प्रकारची दखल न घेतल्याने खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली चुलबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुरली बुरंगे, शहाजी बुरंगे, गजानन बुरंगे, प्रताप बुरंगे, अर्जुन पायघन, सदाशिव पायघन, दत्ता तसनुसे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.beed news farmer’s agitation on krishi day in majalgaon tahsil

Also Read: GST Anniversary : कर भरणा सुलभ अन् महसूलात वाढ
शेतकरी वंचित
जगाचा पोशिंदा म्हणुन शेतकरी ओळखला जातो. आर्थिक अडचणीतून देखील या शेतकऱ्यांनी पिकविमा भरलेला आहे. मात्र शासनाच्या उदासीन आणि विमा कंपनीच्या Crop Loan आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत आहे. कृषी दिनी शेतकऱ्यांना अन्नत्याग, चुलबंद आंदोलन करावे लागत आहे.
Esakal