रत्नागिरी : ‘आम्ही शिवभक्त’ या शिवभक्तांच्या संस्थेने आज सलग पाचव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा, दुचाकी फेरी काढली. ‘रत्ननगरी’ ढोल-ताशा पथकाने या यात्रेत ढोल-ताशांचा गजर केला. बालशिवाजीच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेला विद्यार्थी आकर्षण ठरला.
ध्व़जावरती शिवरायांची प्रतिमा
ऐतिहासिक पतितपावन मंदिर येथून फेरीला सकाळी 10 च्या सुमारास प्रारंभ झाला. भगवे फेटे, धोतर, पांढरा झब्बा, नऊवारी साडी अशा पारंपरिक वेशभूषेत महिला-पुरुष सहभागी झाले. ही फेरी लक्ष्मीचौक, गोखले नाका, मारुती आळी, एसटी स्टॅंड, जयस्तंभमार्गे मारुती मंदिर येथे छत्रपती शिवमूर्तीपर्यंत काढण्यात आली. तेथे महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुमारे पन्नास दुचाकी, रत्ननगरी ढोल-पथकातील 100 कार्यकर्ते आदी मिळून अडीचशे शिवभक्तांनी फेरीत भाग घेतला. या फेरीचे नियोजन गौरव शिंदे, स्वप्नील शिंदे, पवन श्रीनाथ, आकाश श्रीनाथ, भवानी पिलणकर आदींनी नियोजन केले.
पारंपरिक वेशभूषेत महिला-पुरुष
भाजपच्या वतीने अभिवादन
मारुती मंदिर येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती अश्वारूढ मूर्तीला जिल्हा भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, सरचिटणीस राजेंद्र पटवर्धन, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम जैन, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, शहराध्यक्ष राजश्री शिवलकर आदी उपस्थित होते.

News Story Feeds