‘भारतीय रेल्वे’ (Indian Railways) हे जगातील चौथे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. वाहतूक व प्रवासासाठी रेल्वेची सोय सर्वात सोपी पद्धत मानली जाते. दररोज लाखोंच्या संख्येनं लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतात जवळ-जवळ 8 हजारहून अधिक रेल्वे स्थानकं आहेत. यातील काही स्थानकं इतकी भयानक आहेत, की सायंकाळच्या सुमारास येथे सन्नाटा पहायला मिळतो. तर काही लोक या स्थानकांना ‘भुताटकी’ मानतात. चला तर, जाणून घेऊया या स्थानकांबद्दल..
नैनी जंक्शन (Naini Junction) : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लोक प्रयागराज येथे स्थित असलेल्या ‘नैनी जंक्शन’मध्ये ‘भुताटकी’ असल्याचे लोक मानतात. या रेल्वे स्थानकाजवळच नैनी जेल आहे. देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना नैनी तुरुंगात कैद केले होते. या कारागृहातील लोकांना अनेक प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. या जुलमी यातनांमुळे तुरुंगातील बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला. लोकांचा असा विश्वास आहे, की नैनी जंक्शनमध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा आत्मा फिरत असतो, त्यामुळे या परिसरात सन्नाटा पसरलेला असतो.
चित्तूर रेल्वे स्टेशन (Chittoor Railway Station) : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील चित्तूर रेल्वे स्टेशनही एक भीतीदायक रेल्वे स्थानक आहे. स्थानकाजवळ राहणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे, की बऱ्याच वर्षांपूर्वी हरीसिंह नावाचा सीआरपीएफ जवान इथल्या ट्रेनमधून खाली आला होता. ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर, आरपीएफ आणि टीटीई यांनी मिळून त्याला मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेपासून न्यायासाठी हरीसिंहचा आत्मा रेल्वे स्थानकावर भटकत आहे.
मुलुंड रेल्वे स्टेशन (Mulund Railway Station Mumbai) : मुंबईत असलेलं मुलुंड रेल्वे स्थानकही ‘भुताटकी’ रेल्वे स्थानकांमध्ये गणलं जातं. या स्थानकात येणारे प्रवासी आणि जवळपास राहणारे लोक असा दावा करतात, की त्यांना लोकांच्या ओरडण्याचा भयानक आवाज ऐकू येतो.
बेगुनकोदर रेल्वे स्टेशन (Begunkodar Railway Station) : पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात असलेल्या या रेल्वे स्थानकाची कथा बरीच रंजक आहे. भुताटकीच्या दाव्यांमुळे स्टेशन 42 वर्षांपासून बंद होते. तथापि, 2009 मध्ये पुन्हा हे रेल्वे स्थानक सुरु करण्यात आले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here