दातांची रचना योग्य नसल्यावर अनेक जण डेंटल ब्रेसेस (Dental braces) बसवून घेतात. डेंटल ब्रेसेस बसवल्यामुळे दातांमधील फट, वाकडे दात सरळ होण्यास मदत मिळते. परंतु, डेंटल ब्रेसेस बसवल्यावर त्यांची काळजी घेणंदेखील तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच या Teeth bracesची काळजी कशी घ्यावी ते पाहुयात.
स्वच्छता राखा –
Teeth braces दररोज वापरत असल्यामुळे त्यांची स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे. दिवसभर आपण जे खातो त्याचे अन्नकण braces मध्ये अडकून बसण्याची शक्यता असते. म्हणूनच, braces स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करावा. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांची पेस्ट तयार करुन त्याने braces स्वच्छ करावेत. जर Teeth braces दातांवर फिक्स बसवले असतील तर लिंबू रस आणि मीठ मिक्स करुन त्याने दात घासावेत.
माऊथवॉशचा वापर करा –
तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी माऊथवॉश हा सर्वोत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी माऊथवॉश करावं. या लिक्विडमुळे दात किंवा ब्रेसेसमध्ये अडकलेले अन्नकण निघण्यास मदत होते.
हे पदार्थ चुकूनही खाऊ नका –
ब्रेसेस बसवल्यानंतर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण, अनेक पदार्थ खाल्ल्यामुळे ब्रेसेस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रेसेस बसवल्यावर चॉकलेट, गोड पदार्थ, सुकामेवा, मैद्याचे पदार्थ (पाव,पिझ्झा) असे पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ ब्रेसेसला चिटकून बसण्याची शक्यता असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here