नागपूर : घसा खराब झाला किंवा खोकला येत असला तर ज्येष्ठमध (Licorice) चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जाते. परंतु, या शिवाही ज्येष्ठमधाचे अनेक फायदे आहेत. चवीला गोड असणारे ज्येष्ठमध कॅल्शिअम, ग्लीसारायजक ॲसिड, अँटी ऑक्सिडंटस्, अँटी बायोटिक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. ज्येष्ठमधाच्या वापराने (licorice powder have many benefits) डोळ्यांशी निगडित विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे, हृदयरोग तसेच जुन्या जखमांच्या उपचारामध्ये अतिशय चांगला गुण येतो. (Licorice-and-licorice-powder-have-many-benefits)

वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषध-गोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणे शक्य आहे. यासाठी ज्येष्ठमध फायदेशीर ठरते. नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चिघळत राहा. ज्येष्ठमधाचा वापर अनेक शतकांपासून केला जात आहे. ज्येष्ठमध हे वात, कफ, पित्त दोषांना शमवून अनेक रोगांमध्ये रामबाण इलाज म्हणून सिद्ध झालेले आहे. संगीत शिकणाऱ्यांसाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते. ज्येष्ठमध असो वा ज्येष्ठमध पावडर फायदे दोन्हीचे आहेत.

Also Read: बेरोजगारीच्या वाळवंटात रोजगाराची संधी देणारा किशोर ‘हिरा’

ज्येष्ठमध हे स्थलज आणि जलज असे दोन प्रकारचे असते. जलजाला ज्येष्ठमधाला मधुपर्णी असेही नाव आहे. हे ज्येष्ठमध दुर्मीळ असून फारच कमी ठिकाणी सापडते. स्थलज ज्येष्ठमध हे बऱ्याच ठिकाणी सापडते. या दोन्हीचा उपयोग आरोग्य आणि त्वचेसाठी करता येतो. मिसरी, अरबी, तुर्की हेदेखील प्रकार यामध्ये असतात. पण यामधील गोडी तुम्हाला वेळेनुसार कमी झालेली दिसून येते.

उचकी थांबवते

बरेचदा पाणी पिऊनही उचकी थांबत नाही. अशावेळी आपण नाक बंद करतो अथवा मध चाटतो. मात्र, उचकी थांबत नाही. अशावेळी ज्येष्ठमधाच्या चूर्णामध्ये मध टाकून खा. तुम्हाला परिणाम लगेच दिसून येईल.

मेंदूला चालना

ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते. यामधील ॲन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात. हृदयाचे आरोग्य कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

रोगप्रतिकारशक्ती

शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.

हार्मोनल संतुलन

ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे संतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते. मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

Also Read: नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

उलटी करताना रक्त येणे

उलटीतून रक्त आले तर ज्येष्ठमध पावडर आणि पांढरे चंदन हे दुधातून उगाळून त्याचे मिश्रण तयार करा आणि चाटत राहा. असे केल्याने तुमचा त्रास बंद होईल.

ॲन्टी बॅक्टेरियल

शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे. यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो.

ॲन्टी अल्सर

ज्येष्ठमधामध्ये ॲन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

(Licorice-and-licorice-powder-have-many-benefits)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here