नागपूर : गर्भावस्थेत महिलांनी खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते. त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. गरोदर महिलांनी भरपूर पाणी प्यावे. फिल्टर्ड पाण्यांचा उपयोग करावा. हलका व्यायाम करावा. (Take-care-during-pregnancy)

सूर्याच्या संपर्कात येताच त्वचेचे रक्षण करा. सूर्यप्रकाशात त्वचा खूपच संवेदनशील होते. ज्यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते.
हलका व्यायाम करा. दररोज थोडे चालत जा. यामुळे त्रास कमी होतो.
थंड हवामानातही पुरेसे पाणी प्या. पाण्याबरोबर फळ आणि भाज्यांचा रस घ्या.
गर्भावस्थेत शरीराला विश्रांतीची मोठी गरज असते. म्हणूनच पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे फार गरजेचे आहे.
भरपूर फळ खा. मसालेदार, तळलेले पदार्थ खाऊ नका.
पोट वाढले असताना त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी क्रीम आणि लोशन वापरा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here