ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या गजर…अमाप उत्साह…अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. देहू मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. संभाजी राजे छत्रपती वारकाऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले होते.

यावर्षी संभाजीराजे छत्रपती यांच्या कुंटुंबियांना पादुकांच्या पूजेचा मान मिळाला. यावेळी ते पत्नी संयोगिताराजे, युवराज शहाजीराजेंसह या सोहळ्यात सहभागी झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही पायी वारी रद्द झाली. सरकारच्या आदेशानुसार मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंरपरेप्रमाणे सोहळा झाला.
यावेळी संभाजीराजे वारकाऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी वाकऱ्यांसोबत त्यांनी पारंपारिक पद्धतीचे खेळ खेळत फुगडी घातली
दुपारी दोन वाजता म्हसलेकर दिंडीतील मानकऱ्यांच्यावतीने पादुका डोक्यावर घेऊन संबळ, टाळमृदंग गजर आणि तुतारीच्या निनादात भजनी मंडपात आगमन झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आज संत तुकाराम महाराजांची पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
सारा आसंमत आणि मंदिर परिसर माउलीमय, भक्तीमय वातावरणात नाहून निघाला.
मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. मंदिर प्रदिक्षणा झाली. वारकरी मंडळी ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोषात तल्लीन झाले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here