मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या नृत्याने आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनालीच्या आगामी चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘हिरकणी’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशानंतर सोनाली ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाबद्दल सोनाली म्हणाली, ‘आम्ही गेल्या वर्षापासून ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटावर काम करत आहोत. ताराराणी यांचे आयुष्य खूप आव्हानात्मक आणि प्रेरणादायी होते.’
सोनालीने नुकतेच ‘डेट भेट’ या चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. कोरोना काळात या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे झाले.
‘डेट भेट’ या चित्रपटामध्ये सोनालीसोबत हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
सोनालीचा ‘झिम्मा’ हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शिनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि निर्मिती सावंत हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोनाली आणि प्रार्थना बेहरे लवकरच ‘फ्रेश लाइम सोडा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘मितवा’ आणि ‘ती आणि ती’ या चित्रपटांनंतर सोनाली आणि प्रार्थनाला या चित्रपटामध्ये एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here