चेहर्याच्या परफेक्ट लुकसाठी, आयब्रो योग्य आकारात ठेवणे फार महत्वाचे आहे, परंतु बर्याच वेळा आयब्रो स्वत: हून करताना, किंवा बर्याच वेळा पार्लर मधून आयब्रो करताना पूर्ण लूक बिघडून जातो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ताबडतोब कुठेतरी बाहेर जावं लागणार असेल तर मग ही समस्या कशी सोडवायची आणि परफेक्ट लुक कसे मिळवायचे? काही सोप्या मेकअप टिप्सचा वापर करून, तुम्ही ओवरप्लक आयब्रोच्या परिपूर्ण लुक मिळवू शकता. यासाठी आपण या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करू शकता. चला तर मग त्या टिप्स जाणून घेऊयात.

पातळ आयब्रोना जाड करण्यासाठी आपण नेहमी वापरत असलेल्या आयब्रोची पेन्सिल आपली समस्या सोडवू शकते.

फेक फुलर आयब्रो लुकसाठी आपण बरीच मेकअप प्रोडक्टस वापरू शकता, त्यातीलच एक लिक्विड लाइनर आहे.

डोळ्यांना जाड बनवणारी मस्करा देखील अशावेळी काम करू शकते. परंतु यासाठी नवीन लिक्विड मस्करा वापरू नका, कारण ते पसरू शकेल.

आपल्या आयब्रोमधील स्पेस भरण्याचा हा एक चांगला मार्ग देखील आहे, ज्यामुळे आपल्याला अधिक नॅचरल लुक मिळेल. यासाठी, जेलच्या मदतीने सुरवातीला आयब्रोचा रिक्त भाग पुढच्या बाजूने भरणे सुरू करा. अशावेळी काळजीपूर्वक लक्ष द्या कि, टिंटेड आयब्रो जेलचा रंग आपल्या आयब्रोच्या नॅचरल रंगाशी जुळत आहे कि नाही.
Esakal