नाथांचे निवासस्थान असलेल्या वाड्यातील विजयी पांडुरंगाच्या मंदिरात दुपारी एकच्या सुमारास पालखी सोहळा प्रमुख तथा नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन झाले.

पैठण (जि.औरंगाबाद) : संत एकनाथ महाराज Saint Eknath Maharaj यांच्या पालखी दिंडीचे गुरुवारी (ता.एक) पंढरपूरकडे Pandharpur औपचारिक प्रस्थान झाले. कोरोनामुळे Corona मोजकेच वारकरी, भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात झाला. गोदाकाठी नाथांच्या समाधी मंदिरात १८ दिवस प्रस्थान सोहळा राहील. शासनाने ठरवून दिल्यानुसार १९ जुलैला राज्य परिवहन महामंडळाच्या Maharashtra State Transport Corporation दोन बसने पालखी सोहळा आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला रवाना होईल. नाथांचे निवासस्थान असलेल्या वाड्यातील विजयी पांडुरंगाच्या मंदिरात दुपारी एकच्या सुमारास पालखी सोहळा प्रमुख तथा नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन झाले. तत्पूर्वी नाथ मंदिरात वारकऱ्यांसह भाविकांनी भजन करून जयघोष केला. त्यानंतर टाळमृदंगाच्या निनादात गोदाकाठी पालखी ओटा येथे दिंडी सोहळा आला. तेथे विसाव्यानंतर ‘भानुदास एकनाथ’असा जयघोष करीत पालखी सोहळा नाथ मंदिरात Nath Temple पोचला. येथे भजन झाले. नगराध्यक्ष सूरज लोळगे, उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी, भाजप महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलिस निरीक्षक किशोर पवार, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, समीर शुक्ल, अरुण काळे, चंद्रकांत अंबिलवादे आदी उपस्थित होते. nath palkhi leave for pandharpur from paithan in aurangabad updates

पैठण (जि.औरंगाबाद) : संत एकनाथ महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी नाथमंदिरात भजनात तल्लीन वारकरी. ( छायाचित्र अशिष तांबटकर.)

Also Read: Aurangabad : औरंगाबादेत कोरोना लसींचा साठा संपला

पायी वारीचा आग्रह कायम

कोरोनामुळे वारीची परंपरा खंडित झाल्याबद्दल वारकऱ्यांमध्ये नाराजी दिसली. वारीचे दिवस कमी करावे, मर्यादित स्वरूप ठेवावे, कोरोनासंदर्भातील निर्बंध घालून शासनाने पायी वारीला परवानगी देण्याबाबत गांभीर्याने फेरविचार करावा, वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करावा, असा आग्रह वर्षानुवर्षे नियमित वारी करणाऱ्यांनी आज कायम ठेवल्याचे दिसले. शासन आमच्या भावनांचा विचार करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Also Read: आईच्या आत्मविश्वासाला मुलांनी दिले बळ ; ९२ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

राजकीय कार्यक्रम, विविध आंदोलने, लग्नांसह सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. इतर काही राज्यांत मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली झाली आहेत. राज्य सरकार मात्र केवळ मंदिरे उघडण्याबाबत निर्णय घेत नसल्याने वारकरी, भाविकांत नाराजी आहे. शासनाने पायी वारीला परवानगी देण्याबाबत विचार करावा.

– रघुनाथ महाराज गोसावी, पालखी सोहळा प्रमुख, पैठण.

वारकरी देहभान विसरून दरवर्षी वारीत सहभागी होतात. पायी वारीसाठी नियमावली करावी. वारकऱ्यांच्या मर्यादित संख्येने दिंड्यांना परवानगी द्यायला हवी.

– विलास मोरे महाराज, पैठण.

वारकऱ्यांतर्फे पायी सोहळ्यांचे व्यवस्थापन नेटके, उत्कृष्ट असते. पालखी मुक्कामांच्या ठिकाणी विविध निर्बंध घालावेत. गर्दी टाळण्यासाठी नियमावली तयार करावी. इच्छाशक्ती असल्यास शासनाला सर्वकाही शक्य आहे.

– सूरज लोळगे, नगराध्यक्ष, पैठण

वारकऱ्यांना कोरोनाची जाणीव आहे. गेल्या वर्षी घरातूनच वारी केली आहे. नियम पालनाची सवय झाली आहे. वारीची परंपरा अखंड सुरू ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. नियम ठरवून पायी वारीला परवानगी देण्याचा विचार व्हायला हवा.

– रेखाताई कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप महिला मोर्चा आघाडी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here