संतोष गिरडे
शिरपूर जैन (जि.वाशिम) ः आपल्या छंदाला जीवन जगण्याचे साधन बनवित आयुष्यभर जीवनगाडा ओढणाऱ्या जन्मांध व्यक्तीची ही संघर्ष कथा. संघर्षाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांना उपदेश करणाऱ्या व्यक्तीची जीवन गाथा, जन्मापासून डोळ्यांची दृष्टी गेलेली, घरची परिस्थिती अत्यंत गरीब, आई-वडिलांच्या मदतीने कसेबसे प्राथमिक शिक्षण घेतले. हिम्मत न हारता मुंबईत जाऊन मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच बासरी वादनांचे शिक्षण घेऊन बासरी वादनालाच जीवन जगण्याचे साधन बनविले. जन्मांध बासरी वादकाने कमालीचा संघर्षं करून हाल-अपेष्टा सहन करून स्वतःचेच नव्हे, तर स्वतःच्या परिवाराला देखील सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. महाराष्ट्रभर फिरून पोटाची खळगी भरली व आपल्या संसाराची व्यवस्थित घडी बसवली. (The flute changed the tone of life)

जीवनातील प्रत्येक वाटेवर कठीण संघर्ष करणाऱ्या बासरी वादक बाजिराव गोविंदराव फड (वय ५९) रा. पळसखेड ता. रिसोड शिरपूर येथे आले असता, त्यांच्या सुरेल बासरी वादनाने शिरपूरकर पार भाराऊन गेले. त्यांची कीव करण्यापेक्षा त्यांच्या कलेची दाद त्यांना अधिक मिळाली.‘चढता सूरज धिरे-धिरे, झाल्या तिन्ही सांजा, दिल दिया है जान भी देगे ये वतन तेरे लिये, दुनिया बनाने वाले’, आशा सुरेल नव्या-जुन्या गाण्याच्या बासरी वादनाने बस स्टँड परिसरातीळ उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या कलेची दाद देत त्यांना अनेकांनी अर्थिक मदतही केली. या बासरीच्या सुरातच त्यांना आयुष्य जगण्याचे सूर गवसले. अपघाताने एखादे मुल घरात जन्माला आले, त्याचे ओझे पालकांना वाटू लागते, तसेच बाजिरांवच्या बाबतीतही झाले. जन्मतःच दृष्टी नसलेल्या बाजिरावच्या वाट्याला अनेक हाल-अपेष्टा आल्या. आई-वडिलांनी जड अंतः कारणाने का होईना त्यांचा सांभाळ केला, त्यांना शिकवले.

Also Read: पाच हजार द्या, मिळवा कोरोना पॉझिटीव्‍ह स्‍वॅब !

प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेल्यानंतरही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. काम करून कसेबसे त्यांनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले, अशातच त्यांची भेट मुंबईतील महादेव पाटील या बासरी वादका सोबत झाली अन् येथूनच त्यांच्या बासरी वादनास प्रारंभ झाला. बासरी वादनांचे धडे घेऊन त्यांनी काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, मात्र दृष्टी बाधित असल्याने शुक्ल काष्ठ त्यांचा पिच्छा सोडत नव्हते. त्यांना कामावर ठेवण्यास कोणी तयार होईना. अखेर त्यानी बासरी वादनालाच आपले पोट भरण्याचे साधन बनवले.

Also Read: शेतकरी झाला करोडपती, सोयाबीन बाजारात न विकता बियाणे करून विकले

बासरीच्या सुरावरच मुला-मुलींचा विवाह
रेल्वे स्टेशन, बस स्टँड येथे जाऊन ते बासरी वादन करू लागले. रसिकांकडून त्यांच्या सुरेल सुराला विशेष दाद मिळू लागली व आर्थिक मदतही मिळू लागली. दरम्यान त्यांचे लग्न झाले, संसार वेलीवर चार फुले उमलली. तीन मुली अन एक मुलाला आपल्या सारख्या संघर्ष करावा लागू नये, यासाठी बाजिरावाने आपल्या मुला-मुलींना शिकवले. बासरीच्या सुराच्या जोरावरच त्यांचे लग्न केले. त्यांचा मुलगा पळसखेडा येथे शेती करतो, बाजिराव दररोज कुठल्यातरी शहरात जाऊन आपल्या बासरीचे सूर उधळतात, परंतु ते कोणापुढेही कधीच हात पसरवत नाहीत.

मी, अंधळा असूनही मला आणखी खूप जीवन जगावेसे वाटते, जीवन सुंदर आहे ते जगता आले पाहिजे, लोक हताश होऊन अविचाराने आत्महत्या करतात. जीवनातील संघर्षाला न घाबरता कुणीही आत्महत्या करू नये. असा संदेश, मात्र त्यांनी आवर्जून ‘सकाळ’शी बोलताना दिला.

The flute changed the tone of life

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here