ढेबेवाडी (सातारा) : शेतात रोपलावणीसाठी तयार केलेले सुमारे पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे भात पिकांसह (Rice Crop) नाचणी व वरीच्या तरूचे वाफे रानडुक्करे व गव्यांच्या कळपांनी फस्त केल्याने निवी, कसणीसह त्या परिसरातील शेतकरी ऐन खरीप हंगामात (Kharif season) मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा प्रकारचे तरू ऐनवेळी अन्यत्र उपलब्ध होत नाही. त्यामुळे लागणीसाठी तयार केलेली शिवारे तशीच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. (Damage To Crops By Wild Animals In Nivi Area Satara Marathi News)
प्रतिवर्षी सात जूनला शेतकरी भात, वरी व नाचणीचे वाफे घालतात. तीन आठवड्यांनी त्या-त्या शिवारात चिखलणी करून रोपलावणीला सुरुवात होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिवर्षी सात जूनला शेतकरी भात, वरी व नाचणीचे वाफे घालतात. तीन आठवड्यांनी त्या- त्या शिवारात चिखलणी करून रोपलावणीला सुरुवात होते. यंदा पावसाने (Rain) ओढ दिल्यामुळे रोपलावणी लांबणीवर पडली असून, अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या गवे व डुकरांच्या कळपांनी तरव्यांचे वाफे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे.
Also Read: राज्यात गृहराज्यमंत्री आहेत, हेच कुणाला माहिती नाही

एकट्या निवी व परिसरातीलच मारुती पाटील, काशिनाथ पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, संगीता भाईंगडे, सीताराम कदम, मारुती कदम, सखाराम हुमणे, भागूबाई पेजे, पांडुरंग मालप, तानाजी गोटल, संगीता भाईंगडे आदी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश असून, आजूबाजूच्या कसनी, निगडे, घोटीलच्याही अनेक शेतकऱ्यांना नुकसानीने जबर फटका बसला आहे. तरूचे वाफे कुरतडून खाल्ल्याने आता रोपलावणी कशी करायची या विवंचनेत शेतकरी आहेत. सध्या सुमारे साठ एकरचे क्षेत्र तरी रोपलावणीविना पडून राहील, असा अंदाज असून, पावसाने आणखी ओढ देऊन रोपलावणी लांबल्यास उर्वरित वाफेही उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. असे निवीतील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती ऊर्फ बाळू पाटील यांनी सांगितले.
Damage To Crops By Wild Animals In Nivi Area Satara Marathi News
Esakal