कोरोना हा आपल्या सगळ्यांसाठी संघर्षाचा काळ आहे. दुसऱ्या लाटेमध्ये सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसलाय. अनेकांच्या घरातील कित्येक माणसं या कोरोना महामारीनं हिरावून घेतली आहेत, अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत. कित्येक लहान मुलं अनाथ झाली आहेत. काही लोकांना हे धक्के सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्या. अनेक कुटुंब बेघर झाली, अनेकांनी आर्थिक नुकसान व कर्जाच्या ताणतणावामुळे आत्महत्या केल्या. या काळात मला खूप लोकांचे राज्यभरातून मदतीसाठी फोन आले. त्याच्या हाकेला धाऊन जाताना शक्य तितक्या लवकर त्यांना बेडची व्यवस्था करून मदतीसाठी प्रयत्न केले. हा अनुभव आहे YIN मुख्यमंत्री बनलेल्या अजय खांडबहाले यांचा. कोरोना काळातील आपला अनुभव कथन करताना खांडबहाले सांगतात…..(Ajay Khandbahale maintained social commitment through YIN)

Also Read: विधानसभा अध्यक्षपद निवडणूक: NCP ला मर्जीतील अध्यक्ष हवा आहे का?

YIN च्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना माझ्या स्वत:च्या गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व त्याचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. या कालावधीत त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती दवाखान्यात अॅडमिट असताना त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांची आर्थिक परिस्थिती आणि फुफ्फुसातील संसर्गाची पातळी सांगणारा HRCT स्कोर जास्त असल्यानं त्यांना रुग्णालयानं अॅडमिट करून घेतलं नाही. ग्रामीण भागातील असल्याने तसेच माहितीचा अभाव असल्यानं अपूर्ण माहिती व योग्य उपचार न मिळाल्यानं त्यांचं राहत्या घरीच निधन झालं. त्या कोविड रुग्ण असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्य भीतीमुळे मृत कोरोना प्रेताला हात लावण्यासही तयार नव्हते त्यामुळे त्यांचं प्रेत कित्येक तास तसंच पडून होतं. दरम्यान, आजूबाजूच्या परिसरातील लोकांना संसर्ग होण्याचा धोका असल्यानं तिथल्या शेजाऱ्यांनी मदतीसाठी मला फोन केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील इतर व्यक्तींनाही मी कळविलं. परंतू, वेळेवर कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही, तेव्हा मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या मुलांना भावनिक आधार देऊन त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यांच्या मनातील भीती दूर करून मी स्वतः अंत्यसंस्कारासाठी आवश्यक ते सर्व साहित्य मध्यरात्री जमा केलं. सहकार्य करणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी PPE किट मध्यरात्री मित्रांच्या मदतीने उपलब्ध करून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली. त्यावेळी खरंच जाणीव झाली की, या महामारीनं माणसांमधील सामाजिक जाणीव व माणुसकीसुद्धा हिरावून घेतली त्यामुळं मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही.

लहानपासूनच होती समाजकार्याची आवड

लहानपणापासूनच मला सामाजिक कार्याची आवड असल्यानं गाव पातळीवर अनेक कार्यांमध्ये माझा सहभाग असायचा. कोरोनाच्या काळात या अनुभवाचा मला खूपच उपयोग झाला. अपूर्ण माहिती व या रोगाविषयी लोकांच्या मनात असलेली अधिकची भीती यामुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्यानं योग्य मार्गदर्शनाअभावी सर्वसामान्य लोक अनेक समस्यांचा सामना करत होते. तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांच्या व राज्यभरात लोकांच्या मदतीसाठी राबविलेला उपक्रम YIN mission Covid @36 च्या माध्यमातून जनजागृती केली व त्यांच्या समस्या जाणून घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या. त्यासाठी मला डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्याने व मदतीने कमी दरात मूळ किमतीत इंजेक्शन्स, औषधे मिळवून देण्याची महत्त्वाची काम राज्यभरात करता आली.

राज्यभरातील 36 जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या मदतीनं केलं कार्य

संदीप काळे सर, श्यामसुंदर माडेवार सर, गणेश जगदाळे सर व राज्यभरातील सर्व समन्वयकांच्या माध्यमातून राज्यभरातील 36 जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या मदतीने इंजेक्शन, प्लाझ्मा दान, रक्तदान शिबिरं आम्ही कोरोना ‘शूर योद्ध्यांच्या’ मदतीने राबवली. तसेच लोकहितासाठी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मदतीचीही चळवळ बळकट करण्यासाठी शासनस्तरावरून देखील खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य झालं. आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता अभियान, लसीकरणासाठी मार्गदर्शन व त्याचे महत्त्व पटवून देऊन भीती दूर करण्याचे काम केले. ऑक्सिजनचे महत्व लक्षात घेऊन राज्यभरात महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन व पर्यावरणदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम ही घेण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सामाजिक आधार निर्माण होऊन विश्वासाचे वातावरण तयार झाले. लोक कोविडविरुद्धच्या लढ्यात एकत्र आले. त्यामुळे संपूर्ण परिसर कोविडमुक्त झाला. त्यानंतर मला राज्यभरातून मदतीसाठी फोन येत होते यावेळी माझ्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी बेड, इंजेक्शन, प्लाझ्मा प्रशासनाच्या मदतीने रुग्णांना मिळवून दिले.

YIN मुख्यमंत्री झाल्यानंतर कामाची संधी

YIN मुख्यमंत्री म्हणून निवड होताच कोरोना रुग्णांसाठी काम करण्याची जबाबदारी मला मिळाली. हे काम अधिक सक्षमपणे करण्यासाठी ऊर्जा निर्माण झाली. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या भागांतील YIN सदस्य व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क करत त्यांच्या मदतीने आरोग्यविषयक, जनजागृतीपर कार्यक्रम, गरजूंना अन्नदान, लसीकरण प्रोत्साहनपर शिबिरे, गरजूंना दवाखान्यांमध्ये बेड मिळवून देणे, औषधोपचार याविषयी मदतकार्य अधिक जलदगतीनं करु शकलो. या कार्यात माझ्यातील नेतृत्वगुणांचा कस लागला. मी हे कार्य अनेकांच्या मदतीने मार्गदर्शनाने करू शकलो, याबाबत सर्वांचे आभार व यापुढेही YINच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सामाजिक कार्य अधिक ऊर्जेने पार पाडेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here