जळगाव ः ओठ (Lips) हे आपल्या त्वचेचा असा एक भाग आहे, जो इतर भागांपेक्षा मऊ आहे. पण सद्याच्या जीवनशैलीच्या वाईट सवयींमूळे ओठांचे आरोग्य (Lip health) खराब होते चालले आहे. त्यामुळे ओठ कोरडे, निर्जीव व काळे पडण्याचे प्रकार वाढले आहे. वेगळ्या पद्धतीने ओठाचे काळजी घेत असाल तरी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही कोणत्या ही दुष्परिणामा शिवाय तुम्ही तुमच्या ओठांची काळजी घेवू शकतात. आणि त्याचे सौंदर्य देखील खुलवू शकतात. त्यासाठी कोरफड प्रभावी उपाय असून कोरफड (Aloe vera plant) अनेक फायदे मिळतात. त्यात बर्न्सवर उपचार, हायपरपीग्मेंटेशनची काळजी घेवू शकतात. कोरफडच्या पानातील जेल अतिशय गुणकारी नैसर्गिक गुण आहे. त्यामुळे जे ओठांना हायड्रेट करतात तसेच नैसर्गिकरित्या अधिक सुंदर बनवतात.( aloe vera plant curative benefits health lips)

Lip

फाटलेले ओठ असे चांगले करा

ओठ फाटणे ही एक सामान्य समस्या असून ही समस्या दुर करण्यासाठी लिप बाम, मलम आदीचा वापर केला जातो. परंतू यामुळे काही काळासाठीच आराम मिळतो, परंतु थोड्या वेळाने पुन्हा ही समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी कोरफडचा वापरा. कोरफड मध्ये पॉलिसेकेराइड असतात, जे खरंच खूप फायदेशीर असतात. पॉलिसेकेराइड्स कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे जो ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. तसेच इतर घटक नवीन पेशींच्या वाढण्यास मदत करते. त्यामुळे पुन्हा एकदा फाटलेले तुमचे ओठ मऊ बनतात.

aloe vera

कोरफड ओलावा टिकवते

ओठांची त्वचा अधिक पातळ असून त्यात योग्यरित्या ओलावा (हायड्रेटेड) नसेल तर आपले ओठ कोरडे आणि फिकट होतात. त्यामुळे कोरड्या ओठांचा वरचा थर देखील सोलला जातो. त्यामुळे वेदना आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या निर्माण होते. यावर कोरफड चांगला उपाय असून कोरफडचा गरामुळे ओठात ओलावा येवून ओठाची त्वचा सुधारते तसेच फाटलेल्या ओठातून रक्तस्त्राव देखील बंद होतो.

Lip

ओठ गुलाबी बनवा

ओठांना गुलाबी बनवण्यासाठी ओठांच्या अनेक प्रयोग केले जातात. पण ओठांना नैसर्गिक गुलांबी रंग देण्यासाठी कोरफड खुप प्रभावी उपाय आहे. कोरफडमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, जे आपल्या ओठात रक्त परिसंचरण उत्तेजित करते. ज्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या ओठांमध्ये गुलाबीपणा येतो. जे अधिक निरोगी आणि हायड्रेटेड असतात.

aloe vera

कोरफड असे वापरा

ओठांवर कोरफडचा वापर अनेक प्रकारे तुम्ही करू शकतात. यात बाजारात उपलब्ध असलेल्या एलोवेरा जेल खरेदी करून बोटाच्या सहाय्याने दिवसातून दोनदा ओठांवर लावा. तसेच तुमच्या घरात किंवा जवळ कोरफडचे वनस्पती असेल तर त्याचे पाने तोडून, ​​कोरफड पाणाचे जेल काढून ते ओठांवर लावावे. तसेच लिप बाम आणि कोरफड असलेली इतर लिप उत्पादने आपल्या लिप केअर तुम्ही वापरू शकतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here