सातारा : आज पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ दुपारी दोनच्या सुमारास तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर यात पाच जण जखमी आहेत. जखमींना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Two-wheeler And car Accident At Pune-Bangalore National Highway In Satara Bombay Restaurant Satara Crime News)

आज पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ दुपारी दोनच्या सुमारास तिहेरी अपघात झाला.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात किरण गुजर (संपूर्ण पत्ता माहित नाही) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे समजते. साताऱ्यातील अजंठा चौकातून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या दिशेने सर्व्हिस रोडने निघालेल्या मालट्रकचा ठक्कर सिटी येथे टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या ट्रकची कारला समोरा-समोर जोरदार धडक बसून मोठा अपघात झाला असून यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार मध्येच सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या सहाय्याने मालट्रक हटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Two-wheeler And car Accident At Pune-Bangalore National Highway In Satara Bombay Restaurant Satara Crime News

Car Accident

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here