“एकदाच काय, 100 वेळादेखील चौकशी केलेत तरी मी घाबरत नाही”

मुंबई: मुंबै बँकेबाबत माझ्यावर आरोप करून लोकांचे हवेत तीर मारणं सुरू आहे. ‘कर नाही तर डर कशाला’. मी चौकशीला घाबरत नाही. ज्या भावनेतून जी चौकशी होईल, त्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे. मी कोणत्याही दबावाला मी घाबरत नाही, भीक घालत नाही. एक काय 100 वेळा चौकशी करा… राज्याचा विरोधी पक्षनेता असल्याने मला दबावात आणून मला अडचणीत आणत आहेत. जेवढे अडचणीत आणाल, तेवढा जास्त आक्रमकपणे मी प्रश्न मांडत राहिन, असा इशारा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला. (BJP Praveen Darekar says I dont fear if someone puts pressure in Mumbai Bank Scam Issue)

Also Read: मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण तातडीने सुरक्षित करा – HC

मुंबई जिल्हा बँकेच्या संदर्भात काही वर्तमानपत्रात आणि काही चॅनेल्समध्ये सतत बातम्या येत होत्या. एक वर्तमानपत्र आणि एक चॅनेल ठरवून बातम्या चालवत आहे. आवाज उठवणारा प्रवीण दरेकर आता कुठे गायब असा आरोप काही ठिकाणी दिसत आहे. त्या सगळ्यांना मी सांगतो की मी कुठेही गेलेलो नाही. एका चॅनेलने बातम्या दाखवल्या म्हणून आमच्या ठेवीदारांचा विश्वास कमी होणार नाही, असा शब्दात मुंबै बँकेबाबत घोटाळा झाला असं म्हणणाऱ्यांना भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं.

Also Read: मराठा आरक्षण हा विषय आता संपुष्टात आलाय – गुणरत्ने सदावर्ते

Mumbai Bank

“माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा की 123 कोटी घोटाळा हा कुठून आणला हे आम्हाला समजलं नाही. सात मुद्याद्वारे मी प्रकरण समजावून सांगू शकतो. आमची बॅंक ही अ वर्ग असणारी बँक आहे. ज्या पिटीशन आहेत, त्या कोर्टाने डिसमिस केलेल्या आहेत. आपल्याकडे न्यायव्यवस्थेच्या पलीकडे काही नाही. मजूर संस्थांना सभासद करणं आणि किती जणांना सभासद करणं याबाबत नियम नाही. डिजास्टर रिकव्हरी साईट गैरप्रकाराने केलं असं बोललं जातं आहे, त्या सर्वांनाही आम्ही उत्तर दिलेली आहेत”, असे दरेकर यांनी स्पष्टीकरण दिले.

Also Read: तर कोणत्याही संकटावर निश्चितच मात करणं शक्य- मुख्यमंत्री

“शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हे माझे राजकीय विरोधक आहेत. प्रकाश सुर्वे यांनी केवळ राजकीय सुडापोटी चौकशी करून काही हाती लागतंय का हे बघत आहेत. प्रकाश सोळंकी यांच्याकडून जाणीवपूर्वक आमची चौकशी लावून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण त्यातून काहीच साध्य झालं नाही. मी इतरांना जसा विरोध करतो, तसाच मी देखील कोणत्याही चौकशीला घाबरत नाही”, असं दरेकर म्हणाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here