जळगाव ः कोरोनानंतर (corona) सर्वच क्षेत्रातील महागाई (Inflation) आकाशाला भेदू पाहात आहे. रोज लागणाऱ्या आवश्‍यक वस्तूंपैकी खाद्यतेल (Edible oil), पेट्रोल(Petrol), डिझेल(Diesel), गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या (Job) गेल्या. बेरोजगारी (Unemployment) वाढली. दुसरीकडे वरील वस्तूंच्या किमतीही वाढत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होत आहे. खाद्यतेलाच्या किमतीतही महामारीत वाढ झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर तीन महिन्यांपासून १८० ते १८५ रुपये किलो आहेत, तर सूर्यफूल व सोयाबीनच्या दरात २० ते २२ रुपयांची घसरण झाली आहे. (ladies good news edible oil price is low)

Also Read: महापौरांच्या खडसे भेटीने शिवसेना नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह!

गेल्या वर्षी मार्चपूर्वी ९० रुपयांवर प्रतिकिलो असलेले सोयाबीन तेल सध्या १४२ वर येऊन ठेपले आहे. मध्यंतरी याचा सर्वाधिक दर १६६ रुपयांवर पोचला होता. नंतर १३५ वर आला. सध्या १४२ रुपये सुरू आहे. शेंगदाणा तेल गतवर्षी १०५ ते ११० रुपयांवर होते. ते वर्षभरात १८०-१८५ प्रतिकिलोपर्यंत पोचले आहे. तब्बल ७५ रुपयांची वाढ वर्षभरात झाली. खाद्यतेल म्हणून सूर्यफुलाचाही वापर अधिक होतो. १८५ रुपयांवर याचा दर गेला होता. तो कमी होऊन आता १६५ रुपयापर्यंत आला आहे.

edible-oil

करडईचे तेलही वापरले जाते. मात्र, जिल्ह्यात करडईचे उत्पन्न अनेक वर्षांपासून शेतकरी घेत नाहीत. यामुळे करडई तेल उपलब्ध नसते. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र हे तेल अधिक विकले जाते.
पामतेल दहा ते १५ वर्षांपूर्वी रेशन दुकानांवर मिळत असे. अतिशय कमी किमतात ते उपलब्ध होत. आता रेशन दुकानांवर हे तेल मिळत नाही. मात्र, अनेक हॉटेलचालक पामतेलाचा वापर विविध पदार्थ तळण्यासाठी करतात. पामतेलाचा दर १५० ते १५५ होता, तो आता खाली येऊन १२८ प्रतिकिलो आहे.

तेलाच्या दरवाढची अनेक कारणे आहेत. त्यात शासनाने इंर्पोट ड्यूटीत सोबत इतर करांमध्ये झालेली वाढ, शेंगदाणा, सोयाबीनला योग्य भाव न मिळणे, कमी पावसामुळे सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीनचे उत्पादन कमी होणे आदी कारणांचा समावेश असल्याचे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

edible-oil

गेल्या ५० वर्षांत तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ मी पाहिलेली नव्हती. सध्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यंदा पाऊस कसा होतो, यावर तेलाचे दर आगामी काळात अवलंबून राहतील.
-राजेश मेहता, तेल उत्पादक व व्यापारी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here